Places to visit in January February 2026: नवीन वर्षात पर्यटनाचा प्लॅन आहे का? जाणून घ्या जानेवारी, फेब्रुवारीमध्ये पर्यटनासाठी भारतातील 8 सर्वोत्तम ठिकाणं. जिथे हिमवृष्टीपासून ते समुद्रकिनारे आणि वाळवंटी ठिकाणांचा समावेश आहे- संपूर्ण ट्रॅव्हल गाइड.

हिवाळा म्हणजे आल्हाददायक ऋतू. सर्वत्र वातावरण प्रसन्न असते. म्हणूनच अनेकजण डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यांत आऊटिंगचा बेत आखतात. त्यातच नाताळची सुट्टी आणि 31 डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्याचा उत्साह तर असतोच! भारत हा पर्यटनासाठी आदर्शच आहे. समुद्र किनाऱ्यांजवळील पर्यटनापासून हिमालयाच्या कुशीत थंड वातावरणाचा आनंद घेता येतो. डिसेंबर तर अर्धा सरला आहे, त्यामुळे जानेवारी आणि फब्रुवारी महिन्यात पर्यटनासाठी कोणती ठिकाणे निवडू शकतो, हे पाहूया.

नवीन वर्षाची सुरुवात झाल्यावर पर्यटनाचे प्लॅन बनू लागतात. तुम्हीही 2026 च्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये व्हेकेशन प्लॅन करण्याचा विचार करत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कुठे जाणे योग्य ठरेल. या यादीमध्ये उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या ठिकाणांचा समावेश आहे. 

गुलमर्ग, जम्मू-काश्मीर

जानेवारी-फेब्रुवारीमध्ये गुलमर्गमध्ये जोरदार हिमवृष्टी होते. येथे तुम्ही स्कीइंग आणि स्नोबोर्डिंगचा आनंद घेऊ शकता. हे ठिकाण निसर्ग आणि फोटोग्राफीसाठी योग्य आहे. इतकेच नव्हे तर, तुम्ही जगातील सर्वात उंच केबल कारपैकी एक असलेल्या गोंडोलाचा आनंद घेऊ शकता.

औली, उत्तराखंड

कमी पैशात छान ठिकाणी फिरायचे असेल तर, उत्तराखंडमधील औली योग्य आहे. याला हिमवृष्टीचा स्वर्ग म्हटले जाते. येथून नंदा देवी टेकडीचे सुंदर दृश्य दिसते. तुम्ही जोशीमठ आणि औली दरम्यान रोपवे प्रवासाचा आनंद घेऊ शकता.

मनाली, हिमाचल प्रदेश

जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तुम्ही मनाली फिरू शकता. येथे 2026 च्या सुरुवातीला मनाली विंटर कार्निव्हल सुरू होतो, जो पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असतो.

जैसलमेर, राजस्थान

दिवसा उबदार आणि रात्री थंड वातावरणाचा आनंद घेण्यासाठी 'सुवर्ण शहर' जैसलमेर योग्य आहे. जानेवारीच्या अखेरीस येथे जैसलमेर डेझर्ट फेस्टिव्हल 2026 आयोजित केला जाईल, जिथे तुम्ही भेट देऊ शकता. हे शहर पाकिस्तानच्या सीमेजवळ आहे.

मुन्नार, केरळ

थंड आणि स्वच्छ हवामान हवे असेल, तर तुम्ही जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मुन्नारला भेट द्या. सभोवतालची हिरवळ आणि कमी थंडी यामुळे हे पर्यटनस्थळ खास बनते. येथे अनेक टॉप स्टेशन्स आहेत, जी लक्ष वेधून घेतात. यासोबतच तुम्ही एराविकुलम नॅशनल पार्कलाही भेट देऊ शकता.

गोकर्ण, कर्नाटक

पार्टी कल्चरपासून दूर शांत आणि निवांतपणासाठी तुम्ही गोकर्णला भेट देऊ शकता. येथे अनेक शांत समुद्रकिनारे आहेत, जे तुमचे मन मोहून टाकतील. यासोबतच तुम्ही ट्रेकिंग आणि धबधब्यांचाही आनंद घेऊ शकता.

कुर्ग, कर्नाटक

कुर्ग हिल स्टेशनला भारताचे 'मिनी स्कॉटलंड' म्हटले जाते. येथील कॉफीच्या मळ्यांना भेट देण्याचा अनुभव खूप खास असतो. तुम्ही या ठिकाणी एबी फॉल्स आणि कॉफी इस्टेट होम स्टेचा आनंद घेऊ शकता.

वर्कला, केरळ

समुद्रकिनाऱ्यावरील उंच कडे, स्वच्छ आकाश आणि शांत वातावरण पर्यटकांना खूप आवडते. तुम्ही येथे नॉर्थ क्लिफ कॅफे आणि पापनासम बीचला अवश्य भेट द्या.