MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • SIP Investment : महिन्याला फक्त 500 गुंतवा आणि करोडपती व्हा, हे सिक्रेट माहितेय का?

SIP Investment : महिन्याला फक्त 500 गुंतवा आणि करोडपती व्हा, हे सिक्रेट माहितेय का?

महिन्याला फक्त ५०० रुपये वाचवून करोडपती होणं खरंच शक्य आहे का? तर याचं उत्तर 'हो' असं आहे. शेअर बाजारावर आधारित म्युच्युअल फंड्समध्ये SIP च्या माध्यमातून तुम्ही दर महिन्याला नियमित गुंतवणूक केली, तर तुमचं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकतं.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 20 2026, 02:33 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
महिन्याला ₹500 वाचवून करोडपती कसं व्हायचं? हे आहे सिक्रेट
Image Credit : ChatGPT

महिन्याला ₹500 वाचवून करोडपती कसं व्हायचं? हे आहे सिक्रेट

प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे भरपूर पैसा असावा. पण गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम नाही, असा विचार करून अनेकजण मागे हटतात. तुम्हीही असाच विचार करत असाल, तर ती मोठी चूक ठरेल. फक्त ₹500 च्या गुंतवणुकीतूनही तुम्ही करोडोंचा फंड कसा उभा करू शकता?

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
SIP मधून करोडो रुपये कमवण्याची पद्धत
Image Credit : magnific

SIP मधून करोडो रुपये कमवण्याची पद्धत

तुम्ही जर छोट्या रकमेची बचत करू शकत असाल, तर म्युच्युअल फंड SIP (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) तुमच्या खूप कामी येईल. SIP म्हणजे म्युच्युअल फंड्समध्ये दर महिन्याला थोडी-थोडी रक्कम गुंतवणे. यात तुम्हाला कंपाऊंडिंगचा (चक्रवाढ व्याज) फायदा मिळतो. या गुंतवणुकीवर दरवर्षी सरासरी १२ टक्के परतावा मिळेल असा अंदाज आपण बांधू शकतो. अर्थात, SIP शेअर बाजाराशी जोडलेली असल्याने परतावा कमी-जास्त होऊ शकतो.

Related Articles

Related image1
Daily Investment : रोज १०० रुपये वाचवून करोडपती कसं व्हायचं? तज्ज्ञांचा सिक्रेट प्लॅन
Related image2
Investment Rules : शेअर मार्केटमध्ये नुकसान टाळायचंय? वॉरेन बफे यांचे हे 5 सिक्रेट रूल्स नक्की वाचा
35
फक्त ₹500 ची SIP पुरेशी आहे का?
Image Credit : Getty

फक्त ₹500 ची SIP पुरेशी आहे का?

गुंतवणुकीचा श्रीगणेशा करण्यासाठी ₹500 ची रक्कम पुरेशी आहे. पण एवढ्याशा रकमेतून लगेच मोठा फंड तयार होईल, असं नाही. मोठा फंड तयार करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे दीर्घकाळासाठी गुंतवणूक सुरू ठेवणं आणि दुसरा म्हणजे दरवर्षी तुमची SIP ची रक्कम थोडी-थोडी वाढवणं. यालाच 'स्टेप-अप SIP' म्हणतात. असं केल्यास तुम्ही नक्कीच करोडो रुपये जमा करू शकता.

45
कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून गणित समजून घ्या
Image Credit : Gemini

कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून गणित समजून घ्या

तुम्ही तुमच्या SIP मध्ये दरवर्षी ठराविक टक्क्यांनी वाढ केली, तर तुमचा पैसा खूप वेगाने वाढतो. हे एका उदाहरणावरून समजून घेऊया.

• मासिक गुंतवणूक: सुरुवातीला ₹500

• स्टेप-अप (दरवर्षी वाढ): वार्षिक 20 टक्के

• गुंतवणुकीचा एकूण कालावधी: 28 वर्षे

• अंदाजित परतावा: वार्षिक 12 टक्के

• तुमची एकूण गुंतवणूक: ₹49.15 लाख

• मिळणारा परतावा: ₹63.32 लाख

• एकूण फंड: ₹1.12 कोटींहून अधिक

55
कंपाऊंडिंगची ताकद आणि मार्केट रिस्कही लक्षात घ्या
Image Credit : Asianet News

कंपाऊंडिंगची ताकद आणि मार्केट रिस्कही लक्षात घ्या

या संपूर्ण प्रक्रियेत कंपाऊंडिंग महत्त्वाची भूमिका बजावते. यात तुम्हाला फक्त मुद्दलावरच परतावा मिळत नाही, तर मिळालेल्या परताव्यावरही व्याज किंवा नफा मिळायला सुरुवात होते. जसजसा वेळ पुढे जातो, तसतशी ही कंपाऊंडिंगची जादू तुमच्या छोट्या गुंतवणुकीला एका मोठ्या फंडात बदलते.

टीप - इथे दिलेला १२ टक्के परताव्याचा अंदाज म्युच्युअल फंड्सच्या दीर्घकालीन कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारात चढ-उतार स्वाभाविक आहेत, त्यामुळे म्युच्युअल फंड्सच्या परताव्याची कोणतीही खात्री नसते. हे पूर्णपणे बाजाराच्या स्थितीवर अवलंबून असतं. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Non Veg After 50 : मटण, चिकन की मासे... वयाच्या 50शी नंतर काय खावे आणि काय टाळावे?
Recommended image2
Onion Storage Tips : रात्री कांदा सोलून फ्रिजमध्ये ठेवताय? सोललेला कांदा खरंच विषारी होतो का?
Recommended image3
Fibre Deficiency : जेवल्यानंतर लगेच भूक लागतेय? शरीरात फायबर कमी असल्याची ही 5 लक्षणं
Recommended image4
Maha Sanyoga : शुक्र आणि चंद्राच्या युतीमुळे महासंयोग, या 5 राशींवर होणार पैशांचा पाऊस
Recommended image5
Microwave Cleaning : फक्त दोन पदार्थ वापरा, मायक्रोवेव्ह ओव्हन होईल एकदम चकाचक
Related Stories
Recommended image1
Daily Investment : रोज १०० रुपये वाचवून करोडपती कसं व्हायचं? तज्ज्ञांचा सिक्रेट प्लॅन
Recommended image2
Investment Rules : शेअर मार्केटमध्ये नुकसान टाळायचंय? वॉरेन बफे यांचे हे 5 सिक्रेट रूल्स नक्की वाचा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved