MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Sunscreen Tips : SPF 30 की 50? सनस्क्रीन घेण्यापूर्वी या 5 गोष्टी नक्की जाणून घ्या

Sunscreen Tips : SPF 30 की 50? सनस्क्रीन घेण्यापूर्वी या 5 गोष्टी नक्की जाणून घ्या

उन्हात त्वचा काळी पडू नये म्हणून तुम्ही सनस्क्रीन घेणार आहात का? मग SPF 30 आणि SPF 50 मध्ये नेमकं काय चांगलं आहे? तुमच्या त्वचेनुसार योग्य सनस्क्रीन कसं निवडायचं आणि ते लावण्याची योग्य पद्धत कोणती?

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 13 2026, 11:36 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
SPF 30 की SPF 50   कोणतं जास्त चांगलं?
Image Credit : x

SPF 30 की SPF 50 - कोणतं जास्त चांगलं?

उन्हात बाहेर जाताना त्वचा काळी पडेल किंवा चेहऱ्यावर डाग पडतील, अशी भीती अनेकांना वाटते. त्यामुळे सनस्क्रीन वापरणाऱ्यांची संख्या वाढतेय. पण दुकानात मिळणाऱ्या SPF 30, SPF 50, PA+++ अशा लेबल्सपैकी नेमकं काय निवडायचं? महागडं सनस्क्रीन खरंच चांगलं असतं का? चला जाणून घेऊया.

SPF म्हणजे सूर्याच्या अतिनील (UVB) किरणांपासून त्वचेचं संरक्षण करण्याची क्षमता. तुम्ही SPF 30 सनस्क्रीन योग्य प्रकारे लावलं, तर ते सुमारे ९७% UVB किरणं रोखतं. तर SPF 50 सुमारे ९८% किरणं रोखतं. त्यामुळे या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक नाही. पण जे लोक जास्त वेळ उन्हात राहतात, त्यांना SPF 50 मुळे थोडं जास्त संरक्षण मिळू शकतं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
फक्त SPF बघून सनस्क्रीन घेऊ नका!
Image Credit : x

फक्त SPF बघून सनस्क्रीन घेऊ नका!

SPF प्रामुख्याने UVB किरणांपासून संरक्षण देतं. पण UVA किरणांमुळेही त्वचा लवकर म्हातारी दिसते, सुरकुत्या पडतात आणि काळे डाग येतात. त्यामुळे सनस्क्रीन विकत घेताना त्यावर 'Broad Spectrum' (ब्रॉड स्पेक्ट्रम) लिहिलंय का, हे नक्की तपासा. भारतात मिळणाऱ्या काही उत्पादनांवर PA+, PA+++, PA++++ असेही टॅग असतात. हे टॅग UVA किरणांपासून मिळणाऱ्या संरक्षणाचे संकेत देतात.

Related Articles

Related image1
Navratri Fasting : नवरात्रीचा उपवास करताय? मग या ५ चुका अजिबात करू नका!
Related image2
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी जेवण टाळताय? मग हे नक्की वाचा
35
तुमच्या त्वचेनुसार कोणतं सनस्क्रीन योग्य?
Image Credit : x

तुमच्या त्वचेनुसार कोणतं सनस्क्रीन योग्य?

तेलकट त्वचा (Oily skin) असणाऱ्यांनी हलकं, ऑइल-फ्री किंवा जेल बेस असलेलं सनस्क्रीन वापरावं. कोरडी त्वचा असणाऱ्यांना मॉइश्चरायझिंग सनस्क्रीनचा फायदा होतो. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांनी सनस्क्रीनमधील घटक तपासावेत आणि गरज पडल्यास त्वचाविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

जास्त घाम येणाऱ्या दिवसांत किंवा पोहायला जाताना 'Water Resistant' (वॉटर रेझिस्टंट) सनस्क्रीन नक्की वापरा. पण लक्षात ठेवा, कोणतंही सनस्क्रीन १००% वॉटरप्रूफ नसतं. त्यामुळे पॅकेटवर दिलेली वेळ नक्की तपासा.

45
सनस्क्रीन किती वेळाने पुन्हा लावायचं?
Image Credit : x

सनस्क्रीन किती वेळाने पुन्हा लावायचं?

घराबाहेर पडण्यापूर्वी किमान १५ मिनिटे आधी सनस्क्रीन लावणं फायद्याचं ठरतं. तुम्ही बाहेर उन्हात असाल, तर दर दोन तासांनी ते पुन्हा लावायला हवं. पोहल्यानंतर, जास्त घाम आल्यावर किंवा रुमालाने चेहरा पुसल्यानंतर सनस्क्रीन पुन्हा लावणं अत्यंत गरजेचं आहे.

55
स्वस्त सनस्क्रीन वापरणं योग्य आहे का?
Image Credit : x

स्वस्त सनस्क्रीन वापरणं योग्य आहे का?

फक्त किंमत बघून सनस्क्रीनचा दर्जा ठरत नाही. चांगल्या कंपनीचं उत्पादन, UVA/UVB संरक्षण, एक्सपायरी डेट आणि ते तुमच्या त्वचेला सूट होतंय का, या गोष्टी तपासा. जास्त SPF असलं तरी ते योग्य प्रमाणात लावलं नाही, तर त्याचा फायदा होत नाही. सनस्क्रीन लावलं म्हणजे उन्हाचा त्रास अजिबात होणार नाही, असं नाही! फक्त सनस्क्रीन पूर्ण संरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे टोपी घालणं, सावलीत थांबणं आणि कडक उन्हात जास्त वेळ न फिरणं, या सवयीसुद्धा महत्त्वाच्या आहेत.

रोजच्या वापरासाठी SPF 30 किंवा त्याहून अधिक असलेलं ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन उत्तम ठरतं. जे लोक जास्त वेळ बाहेर असतात, ते SPF 50 निवडू शकतात. पण फक्त SPF नंबर न बघता UVA संरक्षण, त्वचेचा प्रकार, वॉटर रेझिस्टंट क्षमता आणि ते पुन्हा लावण्याची सवय या गोष्टींनाही महत्त्व द्या. योग्य सनस्क्रीनचा नियमित वापर हीच त्वचेच्या काळजीची पहिली पायरी आहे!

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी जेवण टाळताय? मग हे नक्की वाचा
Recommended image2
Instant Curd : फक्त १ तासात बनवा घट्ट आणि मलाईदार दही! जाणून घ्या ही सोपी ट्रिक
Recommended image3
Best Air Fryers : दिवाळी 2026 साठी बजेटमधील ५ बेस्ट एअर फ्रायर्स, ॲमेझॉनवर मिळतायत भन्नाट डील्स
Recommended image4
कोणत्याही ड्रेसवर मॅच होतील असे 7 ट्रेंडी फ्लॅट फूटवेअर
Recommended image5
Horoscope 13th October 2026 : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या राशीभविष्य
Related Stories
Recommended image1
Navratri Fasting : नवरात्रीचा उपवास करताय? मग या ५ चुका अजिबात करू नका!
Recommended image2
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी जेवण टाळताय? मग हे नक्की वाचा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved