Ring Of Fire म्हणजे काय? सूर्यग्रहणावेळीच का दिसते घ्या जाणून

| Published : Sep 27 2024, 01:19 PM IST / Updated: Sep 27 2024, 01:23 PM IST

ring of fire

सार

Ring of Fire solar eclipse October 2024 : ऑक्टोंबर 2024 च्या पहिल्या आठवड्यात आकाशात एक खास नजारा दिसणार आहे. याला ‘रिंग ऑफ फायर’ असे संबोधले जाते. सूर्यग्रहणावेळीच रिंग ऑफ फायरची स्थिती निर्माण होते.

Solar Eclipse October 2024 Details : वर्ष 2024 मधील ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीचा आठवडा अत्यंत खास असणार आहे. कारण ऑक्टोंबरच्या सुरुवातीलाच म्हणजेच 2 ऑक्टोंबरला आकाशात तुम्हाला अद्भूत नजारा पहायला मिळणार आहे. या दिवशी ‘रिंग ऑफ फायर’ पहायला मिळणार आहे. खरंतर, 2 ऑक्टोंबरला सूर्यग्रहण असल्याने रिंग ऑफ फायरची स्थिती निर्माण होणार आहे. ऑक्टोंबरमधील सूर्यग्रहण यंदाच्या वर्षातील अखेरचे ग्रहण असणार आहे. हे ग्रहण काही देशांमध्ये दिसणार आहे. जाणून घेऊयासूर्यग्रहणासंबंधित काही खास गोष्टी सविस्तर...

किती प्रकारचे असते सुर्यग्रहण
वैज्ञानिकांनुसार, सूर्यग्रहणाचे काही प्रकार असतात. जसे की, पूर्ण सूर्यग्रहण, अर्ध सूर्यग्रहण किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण. तर पूर्ण सुर्यग्रहणावेळी चंद्र आपल्या सावलीने सूर्याला पुर्णपणे झाकतो. अर्ध सूर्यग्रहणावेळी सुर्याचा काही भाग चंद्राच्या सावलीमुळे झाकला जातो. याशिवाय कंकणाकृती सूर्यग्रहणावेळी सुर्य पृथ्वीपासून लांह असल्याने चंद्र सूर्याला पुर्णपणे ग्रहणावेळी झाकू शकत नाही. यामुळे सूर्याचा प्रकाश चंद्राच्या मागून एका गोळ्याच्या रुपात दिसते.

रिंग ऑफ फायर म्हणजे काय?
कंकणाकृती सूर्यग्रहणावेळी ज्यावेळी चंद्राच्या मागून सूर्याचा प्रकाश दिसताना जे वर्तुळ तयार होते त्याला 'रिंग ऑफ फायर' असे म्हटले जाते. अनेक वर्षानंतर रिंग ऑफ फायरचा दुर्मिळ योग पहायला मिळतो. वैज्ञानिक भाषेत याला 'एन्युलर सोल एक्लिप्स' असे म्हटले जाते.

ऑक्टोंबर 2024 मधील सूर्यग्रहणाची वेळ
2 ऑक्टोंबरला असणारे सूर्यग्रहण यंदाच्या वर्षातील दुसरे आणि अखेरचे सूर्यग्रहण असणार आहे. हे सूर्यग्रहण दक्षिण प्रशांत महासागर, अर्जेंटिना, दक्षिण अटलांटिक महासागरसारख्या देशांमध्ये दिसणार आहे. भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहण 2 ऑक्टोंबर, बुधवारी रात्री 9 वाजून 12 मिनिटांनी सुरु होणार असून मध्यरात्री 03 वाजून 17 मिनिटांनी संपणार आहे.

भारतातही दिसणार सूर्यग्रहण?
2 ऑक्टोंबरला असणारे सूर्यग्रहण भारतात कुठेच दिसणार नाहीये. ज्योतिषांनुसार, भारतात सूर्यग्रहण दिसणार नसल्याने येथे कोणताही सूतककाळ नसणार आहे. ज्या देशांमध्ये सुर्यग्रहण असणार आहे तेथेच सूतककाळ असणार आहे. सूतककाळ ग्रहणाच्या 12 तास आधी सुरु होतो.

आणखी वाचा : 

सूर्यग्रहण 2024 कधी आहे?, भारतातील ग्रहणाची वेळ सुतकसह संपूर्ण माहिती

Sarva Pitru Amavasya वेळी असणाऱ्या सुर्यग्रहणात श्राद्ध करु शकतो? पाहा तारीख