MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Snake Plant : आरोग्य, शांतता आणि शुद्ध हवा... घरात हे एक रोप लावा, फायदेच फायदे!

Snake Plant : आरोग्य, शांतता आणि शुद्ध हवा... घरात हे एक रोप लावा, फायदेच फायदे!

स्नेक प्लांट, ज्याला सापासारख्या पानांमुळे ओळखलं जातं, हे एक लोकप्रिय इनडोअर रोप आहे. याची जास्त काळजी घ्यावी लागत नाही. हे रोप रात्रीसुद्धा ऑक्सिजन देतं आणि हवेतील विषारी घटक शुद्ध करून आपलं आरोग्य चांगलं ठेवतं.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Aug 11 2026, 04:00 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
लोकप्रिय इनडोअर रोप
Image Credit : pinterest

लोकप्रिय इनडोअर रोप

हे रोप कमी देखभालीत सहज वाढतं आणि घरातलं वातावरण सुधारतं. स्नेक प्लांटचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते हवा शुद्ध करतं. हे हवेतील फॉर्मल्डिहाइड, बेंझिन आणि ट्रायक्लोरोइथिलीनसारखे घातक प्रदूषक कमी करतं. त्यामुळे घर आणि ऑफिससाठी हे एक लोकप्रिय रोप आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
रात्रीही देतं ऑक्सिजन
Image Credit : chat gpt

रात्रीही देतं ऑक्सिजन

या रोपाची आणखी एक खासियत म्हणजे ते रात्रीच्या वेळीही ऑक्सिजन सोडतं. यामुळे चांगली झोप लागते आणि बेडरूममधील हवा शुद्ध राहते. अनेकजण त्यामुळेच हे रोप आपल्या बेडरूममध्ये ठेवणं पसंत करतात.

Related Articles

Related image1
Gardening Tips : तांदळाचं पाणी फेकून देताय? थांबा! या ५ झाडांसाठी हे आहे पॉवर टॉनिक
Related image2
Money Plant: एकही पैसा खर्च न करता मनी प्लांट होईल हिरवागार आणि घनदाट, ही सोपी ट्रिक वापरा!
35
मानसिक शांतता देणारं रोप
Image Credit : chat gpt

मानसिक शांतता देणारं रोप

स्नेक प्लांटला मानसिक शांतता देणारं रोप मानलं जातं. घरात किंवा कामाच्या ठिकाणी हिरवळ असल्यास तणाव कमी होतो आणि सकारात्मक वातावरण तयार होतं. याची साधी आणि आकर्षक रचना खोलीचं सौंदर्य वाढवते आणि मनाला ताजेतवानं करते.
45
कमी पाण्याची गरज
Image Credit : pinterest

कमी पाण्याची गरज

जर तुम्ही कमी देखभालीचं रोप शोधत असाल, तर स्नेक प्लांट एक उत्तम पर्याय आहे. याला वारंवार पाणी घालण्याची गरज नसते. साधारणपणे, आठवड्यातून एकदा किंवा माती पूर्णपणे कोरडी झाल्यावर पाणी देणं पुरेसं आहे.
55
कमी उजेडातही वाढतं
Image Credit : instagram

कमी उजेडातही वाढतं

या रोपाला जास्त पाणी घातल्यास त्याची मुळं सडू शकतात. हे रोप कमी उजेडात किंवा अप्रत्यक्ष सूर्यप्रकाशातही चांगलं वाढतं. त्यामुळे ज्यांची जीवनशैली धावपळीची आहे, त्यांच्यासाठी हे एक आदर्श रोप आहे.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेवेळी नेसू शकता या डिझाइन्सच्या साड्या
Recommended image2
नेकलेस दिसेल रिअल डायमंडसारखा, 1K मध्ये करता येईल खरेदी
Recommended image3
Chanakya Niti : या 4 प्रकारच्या लोकांशी तुमची कमाई आणि वैयक्तिक समस्यांबद्दल कधीच बोलू नका
Recommended image4
महिलांनी डार्क चॉकलेट खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे, रहाल तंदुरुस्त
Recommended image5
Sweet Cravings : जेवणानंतर गोड खावंसं वाटतं? ही फक्त सवय नाही, 'ही' ४ मोठी कारणं असू शकतात!
Related Stories
Recommended image1
Gardening Tips : तांदळाचं पाणी फेकून देताय? थांबा! या ५ झाडांसाठी हे आहे पॉवर टॉनिक
Recommended image2
Money Plant: एकही पैसा खर्च न करता मनी प्लांट होईल हिरवागार आणि घनदाट, ही सोपी ट्रिक वापरा!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved