Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचा होते कोरडी आणि येते खाज, हे आहेत उपाय
हिवाळ्यात त्वचा कोरडी होत असल्याने येणारी खाज घालवण्यासाठी खाली दिलेल्या टिप्स वापरून पाहा. खाजेपासून नक्कीच आराम मिळेल.

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्याच्या टिप्स
हिवाळा आला की त्वचा कोरडी होते आणि खाज सुटते. खाजवल्यामुळे त्वचेवर पांढरे चट्टे येतात आणि तिथे थोडीशी आग होत राहाते. रात्रीच्या वेळी ही खाज जास्तच वाढते. अशा स्थितीत खाली दिलेल्या टिप्स फॉलो करा. यामुळे त्वचेला खाज सुटणार नाही. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत हे उपाय.
मॉइश्चरायझर
उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात त्वचा जास्त कोरडी होते. हे टाळण्यासाठी हिवाळ्यात सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस मॉइश्चरायझर वापरा. आंघोळीनंतर त्वचेतील ओलावा पूर्णपणे जाण्याआधीच मॉइश्चरायझर लावा.
जास्त साबण वापरू नका!
हिवाळ्यात आपण गरम पाण्याने आणि भरपूर साबण लावून आंघोळ करतो. पण जास्त साबण वापरल्याने त्वचेला जास्त खाज येऊ शकते. तसेच, तुम्ही वापरत असलेल्या साबणामध्ये जास्त केमिकल्स नाहीत याची खात्री करा.
सनस्क्रीन
हिवाळ्यात कुठे कडक ऊन असतं, असं समजून सनस्क्रीन वापरणं बंद करू नका. कारण हिवाळ्यातही सूर्यकिरणांचा प्रभाव असतो. त्यामुळे, त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी सनस्क्रीन लावायला विसरू नका. तसेच हातांसाठी ग्लोव्हज आणि डोक्यावर टोपी घालणे चांगले.
सप्लिमेंट्स
हिवाळ्यात सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी कमी प्रमाणात मिळतं. शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे त्वचा जास्त कोरडी होऊन खाज सुटते. ही खाज कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घ्या. यामुळे खाज कमी होईल आणि त्वचा चमकदारही होईल.
डॉक्टरांना कधी भेटावे?
वर सांगितलेले उपाय करूनही हिवाळ्यात त्वचेला जास्त खाज येत असेल, तर लगेचच एका चांगल्या त्वचा तज्ज्ञांना भेटा आणि योग्य उपचार घ्या.

