Overcooked Rice : भात गिजगा झालाय? या ट्रिक्सने बनवा पुन्हा मोकळा, सळसळीत
भात शिजवताना पाणी जास्त झाल्यामुळे तो गिजगा किंवा चिकट झालाय का? काळजी करू नका. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही काही मिनिटांतच या चिकट भाताला पुन्हा मोकळा, सळसळीत बनवू शकता.
13

Image Credit : Getty
चिकट भात मोकळा करण्याच्या सोप्या पद्धती
भात चिकट वाटत असेल तर तो एका मोठ्या ताटात काढून पसरवा आणि फॅनखाली ठेवा. यामुळे भातातील ओलावा कमी होतो. तुमच्याकडे वेळ कमी असेल, तर भात एका पसरट भांड्यात काढून झाकण न लावता १५-२० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. थंड हवेमुळे भात मोकळा होतो. (फ्राईड राईस बनवतानाही ही ट्रिक वापरतात).
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

23
Image Credit : Gemini AI
ब्रेड स्लाइसची जादू
गरम भातावर ब्रेडचे २-३ स्लाइस ठेवा. भांड्यावर झाकण ठेवून ५ ते १० मिनिटे मंद आचेवर ठेवा. ब्रेड भातामधील जास्तीचा ओलावा शोषून घेतो. याशिवाय, भात थोडा ओलसर असेल तर झाकण काढून काही मिनिटं मंद आचेवर ठेवा, यामुळेही ओलावा कमी होतो. पण भात जास्त ढवळू नका, नाहीतर तो तळाला चिकटून करपू शकतो.
33
Image Credit : Getty
पॅनवर हलकेच परतून घ्या
एका नॉन-स्टिक पॅनमध्ये थोडं तूप किंवा तेल गरम करा. त्यात चिकट भात घालून ३-४ मिनिटं मंद आचेवर हलक्या हाताने परता. यामुळे भात मोकळा तर होतोच, पण त्याला छान सुगंधही येतो. जर भात खूपच गिजगा झाला असेल, तर तुम्ही त्याचा उपयोग फोडणीचा भात, दही-भात किंवा वडे/डोशाच्या पिठात करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, चिकट भात नीट करण्यासाठी त्यात पुन्हा पाणी घालू नका किंवा जोरात ढवळू नका.

