लिंबामध्ये नैसर्गिक सायट्रिक ॲसिड असतं. रोज लिंबू पाणी प्यायल्याने दातांवरील इनॅमल हळूहळू कमजोर होऊ शकतं. यामुळे दातांमध्ये सेन्सिटिव्हिटी वाढण्याचा धोका असतो.
मुंबई : लिंबू पाण्याचे अनेक फायदे असले तरी, काही आरोग्य समस्या असणाऱ्यांनी ते रोज पिणं टाळावं, असं तज्ज्ञ सांगतात. तुम्हाला वारंवार ॲसिडिटी किंवा पित्ताचा त्रास होत असेल, तर लिंबू पाणी पिणं टाळा. पचनाच्या समस्या असणाऱ्यांनीही लिंबू पाणी पिऊ नये.
लिंबामध्ये नैसर्गिक सायट्रिक ॲसिड असतं. रोज लिंबू पाणी प्यायल्याने दातांवरील इनॅमल (Enamel) हळूहळू कमजोर होतं. यामुळे कालांतराने दातांची सेन्सिटिव्हिटी वाढते. तज्ज्ञांच्या मते, लिंबू पाणी प्रमाणात प्यावं आणि त्यानंतर साध्या पाण्याने तोंड स्वच्छ धुवावं.
तोंडात फोड किंवा अल्सर (Mouth Ulcer) आले असतील, तर ते बरे होईपर्यंत लिंबू पाणी पिऊ नका. कारण लिंबाच्या रसामुळे जखमेवर जळजळ आणि वेदना होऊ शकतात. यामुळे जखम भरण्याची प्रक्रिया आणखी मंदावते. ज्यांना गॅस्ट्रायटिस, पोटातील अल्सर किंवा ज्यांची पचनसंस्था संवेदनशील आहे, त्यांनी रोज लिंबू पाणी पिण्यापूर्वी काळजी घ्यावी.
लिंबू पाणी प्यायल्याने किडनी जास्त लघवी तयार करते. लघवीवाटे पाण्यासोबत शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सही बाहेर फेकले जातात. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं. थकवा, ओठ कोरडे पडणे आणि जास्त तहान लागणे ही त्याची लक्षणं आहेत. रोज लिंबू पाणी प्यायल्याने तीव्र डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. कारण लिंबूवर्गीय फळांमध्ये 'टायरामाइन' (Tyramine) नावाचा घटक जास्त प्रमाणात असतो. लिंबाचा अनियंत्रित वापर केल्यास केस गळायला लागतात. इतकंच नाही, तर केस तुटण्याची समस्याही वाढू शकते.


