Marathi

त्वचेची काळजी घेण्यासाठी आहारात कोणते पदार्थ असावेत?

चांगली त्वचा मिळवण्यासाठी फक्त महागडी उत्पादनं पुरेशी नाहीत, तर योग्य आहारही महत्त्वाचा आहे. पाहूया त्वचेसाठी फायदेशीर ६ पदार्थ.

Marathi

काकडी

काकडीमध्ये ९५-९६ टक्के पाणी असतं. यामुळे त्वचा हायड्रेट राहते, म्हणजे त्वचेतील पाण्याची पातळी टिकून राहते. यामुळे त्वचेला एक नैसर्गिक चमक येते.

Image credits: pixabay
Marathi

हळद

हळद त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. ज्या त्वचेवर मुरुमं येतात, लालसरपणा कमी करायला हळद मदत करते. नियमित सेवनाने त्वचेचा रंग उजळण्यासही मदत होते.

Image credits: Getty
Marathi

आवळा

आवळा व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण असतो. चेहऱ्यावरचे काळे डाग आणि पिग्मेंटेशन कमी करण्यासाठी आवळा मदत करतो.

Image credits: Getty
Marathi

तूप

साजूक तूप त्वचेला आतून मॉइश्चराइझ करतं. यामुळे त्वचेचा कोरडेपणा आणि चेहऱ्यावरच्या बारीक सुरकुत्या (Fine Lines) कमी होतात.

Image credits: Getty
Marathi

अक्रोड

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे त्वचेवरची सूज कमी करतात आणि सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांमुळे होणारं नुकसान टाळतात.

Image credits: Getty
Marathi

बीट

त्वचेचा रंग आणि चमक सुधारण्यासाठी रोज बीट खाणं खूप फायदेशीर आहे. बीटमध्ये लोह, फोलेट आणि बीटालेन्स यांसारखे पोषक घटक भरपूर असतात.

Image credits: pixabay

Gold Earrings : रोजच्या वापरासाठी बेस्ट गोल्ड इअररिंग्स... सिंपल, एलिगंट, ट्रेंडी डिझाइन्स

Gold Necklace : 4 तोळ्यामध्ये बनवा हे सुंदर हार, पाहा लेटेस्ट डिझाइन्स

सिल्क साडीवर घाला हे ट्रेंडी झुमके, सगळ्यांच्या नजरा तुमच्यावरच खिळतील

फॅटी लिव्हरची समस्या आहे? अशी घ्या वेळीच आरोग्याची काळजी