सार
Republic Day 2025 Rangoli : येत्या 26 जानेवारीला देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशातच शाळेच्या पटांगणात काढण्यासाठी काही सोप्या रांगोळी डिझाइन पाहूया…
Republic Day 2025 Rangoli Design : नववर्ष 2025 ची सुरुवात झाली आहे. अशातच येत्या 26 जानेवारीला देशाच 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. ऐतिहासिक माहितीनुसार, देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 26 जानेवारी 1950 रोजी 21 तोफ्यांची सलामी देण्यासह ध्वजारोहण करत भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित केले होते. या क्षणाची इतिहासात सोनेरी अक्षराने नोंद करण्यात आली आहे. अशातच यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेच्या पटांगणात काढण्यासाठी काही सोप्या रांगोळी डिझाइन पाहूया...
वंदे मातरम् च्या जयघोषातील खास रांगोळी
वंदे मातरम् असा जयघोष लिहिलेली खास रांगोळी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेच्या पटांगणात काढू शकता. या रांगोळीमध्ये देशाच्या तिरंग्याचे रंग भरण्यासह स्वातंत्र मिळाल्याचा आनंद दर्शवणारा एक पक्षीही काढू शकता.
प्रजासत्ताक दिन साजरा करणारी खास रांगोळी
26 जानेवारीला असणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी ध्वजारोहण करत तिरंग्याला सलाम केला जातो. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हातात तिरंगा आणि तिरंग्यातील रंगाचे फुगे घेऊन उभ्या असलेल्या मुलीची रांगोळी काढू शकता.
जाड ठिपक्यांची रांगोळी
प्रजासत्ताक दिनानिमित्त सोपी आणि सुंदर अशी तिरंग्याच्या रंगातील जाड ठिपक्यांची रांगोळी शाळेच्या पटांगणात काढू शकता. या रांगोळीच्या बाजूने फुलांची डिझाइनही करण्यात आली आहे.
मोराची रांगोळी
भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या मोराची रांगोळी 26 जानेवारीला असणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमत्त काढू शकता. मोराचे पंखांमध्ये तिरंग्याचे रंग वापरुन रांगोळीला अधिक आकर्षक डिझाइन करू शकता.
तिरंग्याची सोपी रांगोळी
प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्याची सोपी अशी रांगोळी शाळेच्या पटांगणात काढू शकता. यासाठी तिरंग्यातील केशरी, पांढरा, निळा आणि हिरव्या रंगांचा वापर करा. याशिवाय रांगोळीच्या बाजूने अन्य कोणतीही डिझाइन काढत रांगोळीची शोभा वाढवू शकता.
आणखी वाचा :
Makar Sankranti 2025 : यंदा 14 की 15 तारखेला संक्रांत? जाणून घ्या शुभ मुहूर्त
क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांचे 8 सुविचार, आयुष्याला देतील प्रेरणा