Realme Neo8 हा कंपनीचा आगामी स्मार्टफोन आहे जो डिस्प्ले, परफॉर्मन्स आणि बॅटरी या सर्व बाबतीत मोठे अपग्रेड घेऊन येतोय. 6.78″ फ्लॅट डिस्प्ले, 1.5K रिझोल्यूशन, 120 Hz रिफ्रेश रेटसह अन्य धमाकेदार फीचर्स मिळणार आहेत. 

Realme Neo 8 : Realme कंपनी आपल्या आकर्षक डिझाईन आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. आता कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आपल्या नव्या Realme Neo 8 स्मार्टफोनमुळे, जो लवकरच बाजारात धमाकेदार अपग्रेडसह झळकणार आहे. ताज्या लीकनुसार या मॉडेलमध्ये दमदार Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर, मोठी 8,000 mAh बॅटरी, आणि आकर्षक 1.5K डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. 

फीचर्स आणि डिझाइन

Realme Neo 8 मध्ये 6.78 इंचाच्या फ्लॅट डिस्प्लेची शक्यता आहे, ज्याचा रिझोल्यूशन 1.5K असा आहे. यावर बायपास झाला असून, डिस्प्ले पॅनल LTPS किंवा LTPO तंत्रज्ञानावर आधारित असण्याची शक्यता आहे. ताज्या लीकनुसार या पॅनेलमध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह स्मूद स्क्रोलिंग आणि टच रिस्पॉन्ससाठी सुधारित PWM डिमिंग देखील असू शकतो.डिझाइन बाबतीतही सुधारणा दिसतील. जसे की, फ्लॅट पॅनेल, संभवतः स्लिम बेजल्स आणि अंडर-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनरसह ही डिव्हाइस आकर्षक ठरू शकते. 

हार्डवेअर आणि परफॉर्मन्स: फ्लॅगशिप-क्वालिटी अपग्रेड

Neo 8 मध्ये कंपनीने मोठा टप्पा उचलण्याचा मानस दर्शवला आहे. प्रमुख लीकनुसार, या डिव्हाइसमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 5 किंवा त्यासारखा उच्च दर्जाचा चिपसेट वापरण्यात येऊ शकतो. यासोबत 8,000mAh बॅटरी दिली जाणार असून ज्यामुळे या फोनचा बॅकअप देखील मागच्या मॉडेलपेक्षा मोठा अपेक्षित आहे. त्याशिवाय या मॉडेलमध्ये वॅपर कूलिंग चेंबर, मोठी RAM-स्टोरेज कॉन्फिगरेशन (12GB+256GB किंवा त्याहून अधिक) यांसारख्या गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी योग्य वैशिष्ट्यांचा समावेश असल्याची माहितीही मिळाली आहे.

कॅमेरा आणि सॉफ्टवेअर

Neo 8 मध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा सेंसर असण्याची शक्यता आहे.अन्य कॅमेरे, अल्ट्रा-वाइड किंवा टेलिफोटो लेन्स इत्यादी बाबतीत अद्याप पुष्टी नाही. सॉफ्टवेअरबाबत, हा फोन Android 16 किंवा त्याच्या आसपासची आवृत्ती आणि Realme UI च्या नवीन आवृत्ती सह येण्याची शक्यता आहे. कॅमेरा आणि सॉफ्टवेअरचा समायोजन चांगला असल्यास, फोटो-विकिडो शूटिंगमध्ये उपयुक्त ठरू शकतो.

किंमत

भारताबाबत लीकनुसार, Neo 8 ची अपेक्षित सुरुवातीची किंमत 29,990 रुपये इतकी असू शकते.लाँच वेळेसंदर्भात, काही अहवालानुसार हा फोन डिसेंबर 2025 मध्ये चीनमध्ये प्रथम आणि नंतर भारतात येऊ शकतो. भारतात येताना स्थानिक कर, आयात शुल्क किंवा इतर घटकांमुळे किंमत बदलू शकते. जर ही किंमत आणि फीचर्स खरी ठरले, तर Neo 8 मिड-हाय आणि हाय एन्ड सेक्संटमध्ये खंबीर स्पर्धक ठरू शकतो.