Stubborn Acne : पिंपल्स परत परत का येतात? जाणून घ्या कारणे आणि उपाय
बदलते हवामान, चुकीची जीवनशैली आणि आहाराच्या सवयींमुळे चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येतात. कितीही उपाय केले तरी ते जात नाहीत. अशावेळी हा ७ दिवसांचा सोपा उपाय नक्की करून पहा.

७ दिवसांचे हेल्दी चॅलेंज
बदलते हवामान, जीवनशैली आणि आहाराच्या सवयींमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या अनेकदा उद्भवते. तुम्ही कितीही उपाय केले किंवा स्किनकेअर रूटीन फॉलो केले, तरी ते पुन्हा पुन्हा येतातच. यामुळे घराबाहेर पडताना तुम्हाला संकोच वाटू शकतो. पण हे ७ दिवसांचे हेल्दी चॅलेंज एकदा नक्की ट्राय करून बघा, कदाचित तुम्हाला पिंपल्सचा त्रास पुन्हा कधीच होणार नाही.

कसे फॉलो करायचे?
सर्वांत आधी तुम्हाला ३-४ लवंग रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायच्या आहेत. सकाळी त्यांची बारीक पेस्ट तयार करा. त्यात थोडासा मध, लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि ताज्या कडुनिंबाच्या पानांची पेस्ट मिसळा. तज्ज्ञांच्या मते, हे मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी घ्यावे.
पिंपल्ससाठी कसे ठरते फायदेशीर?
लवंगमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. कडुनिंबाचा वापर पारंपारिकपणे त्वचेच्या काळजीसाठी केला जातो. तर मध आणि लिंबाचा रस हे आपल्या आहारातील नेहमीचे घटक आहेत.
आठवड्याभरात फरक पडतो का?
हा उपाय नियमित केल्यास पिंपल्स आणि जळजळ कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, प्रत्येकाची त्वचा, हार्मोन्स, आहार, जीवनशैली आणि पिंपल्सची तीव्रता वेगळी असते. त्यामुळे अवघ्या ७ दिवसांत पिंपल्स पूर्णपणे नाहीसे होतील, याची खात्री आम्ही देऊ शकत नाही. पिंपल्स नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे, सात्विक आहार घ्यावा तसेच तेलकट व मसालेदार पदार्थ कमी खावेत.
पण जर तुमचे पिंपल्स खूप जास्त असतील, दुखत असतील, त्यांचे डाग पडत असतील किंवा ते वारंवार येत असतील, तर घरगुती उपाय करण्यापेक्षा डर्मेटोलॉजिस्टचा (त्वचारोग तज्ज्ञ) सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल. गर्भवती महिला किंवा आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी कोणताही नवीन घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
तज्ज्ञांचा सल्ला घ्या
तरीही, हे सर्व घटक एकत्र करून रिकाम्या पोटी घेतल्याने पिंपल्स नक्की कमी होतील, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे वैद्यकीय पुरावे उपलब्ध नाहीत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे या मजकुरातील माहिती आणि सूचना केवळ सामान्य जागरूकतेसाठी आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा पात्र वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याचा पर्याय असू शकत नाही.

