Realme GT7 Pro वर धमाकेदार सूट, केवळ 49,999 रुपयांत करा खरेदी करण्याची संधी; वाचा डील
Realme GT7 Pro स्मार्टफोन अॅमेझॉनवर धमाकेदार सूटसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर फोनवर तब्बल 10 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

Realme GT7 Pro वर धमाकेदार सूट
तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर Amazon वर Realme GT7 Pro स्मार्टफोनसाठी धमाकेदार सूट दिली जात आहे. या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर फोन 10,500 रुपयांच्या सूटसह तुम्ही खरेदी करू शकता. ज्या युजर्सला फ्लॅगशिप प्रोसेसरचा वापर करायचा नाही त्यांच्यासाठी GT7 Pro महत्वाची डील ठरू शकते. यामध्ये तुम्हाला Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर, AMOLED डिस्प्ले और 5800mAh ची बॅटरी मिळणार आहे. जाणून घेऊया फोनवर मिळणारी ऑफर, किंमत आणि फीचर्सबद्दल सविस्तर माहिती.
स्मार्टफोनवरील ऑफर
Realme GT 7 Pro च्या 12GB RAM + 256GB इंटरनल स्टोरेजची सुरुवातीची लाँचची किंमत 59,999 रुपये आहे. पण Amazon वर स्मार्टफोन 50,999 रुपयांना लिस्टेड करण्यात आला आहे. म्हणजेच फोनवर 9 हजार रुपयांची थेट सूट दिली जात आहे. याशिवाय काही निवडक बँक आणि क्रेडिट कार्ड्सच्या माध्यमातून पेमेंट केल्यास युजर्सला 1500 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅकही दिला जाणार आहे. यामुळे स्मार्टफोनची एकूणच किंमत 49,999 रुपये होईल. हा स्मार्टफोन दोन रंगात mars orange आणि Galaxy Grey मध्ये उपलब्ध आहे.
Realme GT7 Pro स्मार्टफोनचे फीचर्स
Realme GT7 मध्ये 6.78 इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले दिला असून जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 6500 निट्सच्या पीक ब्राइटनेससह येणार आहे. डिवाइसच्या पॅनलला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i दिला आहे. याशिवाय स्मार्टफोन Android 15 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतो. Realme कडून तीन प्रमुख Android अपडेटचे आश्वासन देण्यात आले आहे. स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर आणि अॅड्रेनो, जो हाय-ऑक्टेन परफॉर्मेन्स देतो. फोनसाठी 5800mAh ची बॅटरी दिली असून ती 120w वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Realme GT7 Pro कॅमेरा फीचर्स
कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास Realme GT7 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असून ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सोबत 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 50MP चा टेलीफोटो कॅमेरा आणि 112 डिग्री फील्ड-ऑफ-व्यू असणारा 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा दिला गेला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी डिवाइसमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देखील आहे.

