सार

Raksha Bandhan 2024 Gift : येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणीने भावाची ओवाळणी केल्यानंतर तिला भावाकडून गिफ्ट दिले जाते. अशातच यंदाच्या रक्षाबंधनावेळी राशीनुसार गिफ्ट देऊ शकता. 

Rakhi Gift Ides According To Zodiac Signs : रक्षाबंधनाचा सण भावाबहिणीच्या अतूट नात्याचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा मानला जातो. या दिवसाची प्रत्येक भावाबहिणीकडून वाट पाहिली जाते. रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा रक्षाबंधन येत्या 19 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. या दिवशी भावाकडून बहिणीला एखादे गिफ्ट दिले जाते. अशातच बहिणीला रक्षाबंधनाला राशीनुसार गिफ्ट दिल्यास नक्कीच तिच्या नशीबासाठी गुड लक ठरेल.

मेष राशी
तुमच्या बहिणीचे नाव चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो अथवा आ अक्षरावरुन सुरू हो त असल्यास तिची राशी मेष आहे. या राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. या राशीच्या बहिणींना लाल रंगातील ड्रेस, चंदनाचा परफ्यूम गिफ्ट करू शकता.

वृषभ राशी
तुमच्या बहिणीचे नाव ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो अक्षराने सुरु होत असल्यास तिची राशी वृषभ आहे. याचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या बहिणीला सिल्व्हर ज्वेलरी अथवा नवे वाहन खरेदी करून देऊ शकता.

मिथुन राशी
तुमच्या बहिणीचे नाव क, की, कु, घ, ढ, छ, के, को, ह अक्षरापासून सुरु होत असल्यास तिची राशी मिथुन आहे. या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. यंदाच्या रक्षाबंधनाला बहिणीला हिरव्या रंगातील ड्रेस, पाचूची अंगठी अथवा हिरव्या रंगातील एखादे गिफ्ट करू शकता.

कर्क राशी
बहिणीचे नाव ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो अक्षरापासून सुरु होत असल्याची तिची राशी कर्क आहे. या राशीचा स्वामी चंद्र आहे. बहिणीला सिल्व्हर ज्वेलरी, सुंदर असा पांढरा ड्रेस अथवा काजूची मिठाई गिफ्ट करू शकता.

सिंह राशी
मा , मी, मू, में, मो, टा, टी, टू, टे अक्षराने बहिणीचे नाव सुरु होत असल्यास तिच राशी सिंह आहे. या राशीचा स्वामी सुर्यदेव आहे. बहिणीला सोन्याची ज्वेलरी, नारंगी रंगातील ड्रेस अथवा ड्राय फ्रुट्स गिफ्ट करु शकता.

कन्या राशी
बहिणीचे नाव ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो अक्षरापासून सुरु होत असल्यास तिची राशी कन्या आहे. या राशीचा स्वामी बुध आहे. बहिणीला रक्षाबंधनाच्या सणावेळी हिरव्या रंगातील ड्रेस, गणपतीची मुर्ती अथवा फोटो गिफ्ट देऊ शकता.

तुळ राशी
रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू अक्षराने बहिणीचे नाव सुरु होत असल्यास तिचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या बहिणीला महागडा परफ्यूम, ड्रेस, ड्राय फ्रुट्स गिफ्ट करू शकता.

वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे नाव तो, ना,नी, नू, ने , नो या,न, यी, यू अक्षराने सुरु होते. यांचा स्वामी मंगळ ग्रह आहे. बहिणीला मोबाइल अथवा अन्य गॅजेट गिफ्ट करू शकता.

धनु राशी
ये, यो, भा, भी भू, धा, फ़ा, ढा, भे अक्षराने नावाची सुरुवात होत असल्यास त्याची राशी धनु राशी आहे. या राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे. या राशीच्या बहिणीला आध्यात्मिक पुस्तके, शिक्षणासाठी लागणारी साहित्ये अथवा पिवळ्या रंगातील वस्तू गिफ्ट देऊ शकता.

मकर राशी
भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी अक्षराने बहिणीचे नाव सुरु होत असल्यास तिचा स्वामी शनिदेव आहे. बहिणीला डार्क चॉकलेट अथव धातूपासून तयार करण्यात आलेले शो-पीस गिफ्ट करू शकता.

कुंभ राशी
गू, गे, गो,सा, सी, सू, से, सो, दा अक्षराने नाव सुरु होत असल्यास तिची राशी कुंभ असून स्वामी शनिवेद आहे. या राशीच्या बहिणीला तुम्ही कपडे, सँडल, ब्रेसलेट, डार्क परफ्यूम गिफ्ट करू शकता.

मीन राशी
बहिणीचे नाव दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची पासून सुरु होत असल्यास तिची राशी मीन आहे. या राशीचा स्वामी देवगुरु आहे. या राशीच्या बहिणीला नारंगी रंगातील मिठाई, पिवळ्या रंगातील ड्रेस अथवा प्रेरणादायी पुस्तके गिफ्ट करू शकता.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

रक्षाबंधनानंतर या 3 राशींच्या समस्यांमध्ये होणार वाढ, धन हानिचीही शक्यता

Raksha Bandhan 2024 साठी हटके आणि ट्रेण्डी राखी डिझाइन, भाऊ होईल खूश