MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • No-Oven Cake : ओव्हन नाहीये? नो टेंशन! १० मिनिटांत बनवा बिस्किटांचा झटपट केक

No-Oven Cake : ओव्हन नाहीये? नो टेंशन! १० मिनिटांत बनवा बिस्किटांचा झटपट केक

घरी केक खावासा वाटतोय पण ओव्हन नाही? मग ही सोपी रेसिपी खास तुमच्यासाठी. फक्त १० मिनिटांत, घरातल्या साहित्यात तयार होणारा हा बिस्किट केक नक्की ट्राय करा.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Aug 08 2026, 04:18 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
बिस्किट केक
Image Credit : chatgpt

बिस्किट केक

शाळेतून आलेली मुलं किंवा ऑफिसमधून आल्यावर लागणारी छोटी भूक, या सगळ्यावर हा केक म्हणजे बेस्ट उपाय आहे. जंक फूडऐवजी हा एक आरोग्यदायी पर्याय आहे जो झटपट तयार होतो. घरातल्या मोजक्या साहित्यात तुम्ही हा केक बनवू शकता.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
साहित्य
Image Credit : chatgpt

साहित्य

हा बिस्किट केक बनवण्यासाठी आधी चॉकलेट किंवा मारी बिस्किटांचे २ पॅकेट घ्या. सोबत एक कप दूध, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि एक चमचा कोको पावडर लागेल. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर एक-दोन चमचे साखरही घालू शकता. केकच्या भांड्याला लावण्यासाठी थोडं बटर किंवा तूपही जवळ ठेवा.

Related Articles

Related image1
Christmas 2025 : ख्रिसमवेळी मुलांसाठी खास तयार करा Plum Cake, वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी
Related image2
Fried Rice Recipe : रेस्टॉरंटसारखा घरच्याघरी असा तयार करा फ्राइड राइस, वाचा स्टेप बाय रेसिपी
35
केकसाठी तयारी
Image Credit : chatgpt

केकसाठी तयारी

सगळ्यात आधी, बिस्किटांचे लहान तुकडे करून मिक्सरमध्ये टाका आणि त्याची बारीक पावडर बनवा. बिस्किटं मुळातच गोड असल्यामुळे जास्त साखरेची गरज नाही, पण हवं असल्यास थोडी घालू शकता. आता ही बिस्किट पावडर एका भांड्यात काढा. त्यात बेकिंग पावडर आणि कोको पावडर घालून चांगलं मिक्स करा. त्यानंतर, हळूहळू दूध घालत मिश्रण एकजीव करा. केकचं बॅटर जास्त घट्ट किंवा पातळ नसावं. शेवटी, स्टीलच्या वाटीला किंवा केकच्या भांड्याला बटर किंवा तूप लावून त्यात हे बॅटर ओता.
45
ओव्हनशिवाय असा बनवा केक
Image Credit : chatgpt

ओव्हनशिवाय असा बनवा केक

एक जाड बुडाची कढई गॅसवर ठेवा. त्यात थोडं मीठ टाकून २-३ मिनिटं गरम करून घ्या (प्री-हीट). आता कढईत एक छोटी स्टँड ठेवा आणि त्यावर केकचं भांडं ठेवा. कढईवर झाकण ठेवून मध्यम-मंद आचेवर केक १०-१५ मिनिटं शिजू द्या. केक शिजला की नाही हे तपासण्यासाठी, त्यात एक टूथपिक घालून बघा. टूथपिक स्वच्छ बाहेर आली, की तुमचा केक तयार आहे! भांड्यातून काढण्यापूर्वी थोडा वेळ थंड होऊ द्या.
55
चॉकलेट सिरप आणि ड्राय फ्रूट्सचा करा वापर
Image Credit : chatgpt

चॉकलेट सिरप आणि ड्राय फ्रूट्सचा करा वापर

केक आणखी छान दिसावा आणि चविष्ट लागावा यासाठी तुम्ही वरून चॉकलेट सिरप टाकू शकता. किंवा, चॉकलेट चिप्स किंवा ड्राय फ्रूट्स घालूनही त्याला सजवू शकता. एकदा तुम्ही हा सोपा, ओव्हनशिवाय बनणारा बिस्किट केक ट्राय केलात, की तुम्ही तो पुन्हा पुन्हा बनवाल हे नक्की.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Ginger Garlic Paste : आलं-लसूण पेस्टमध्ये मिक्स करा ही एक गोष्ट, महिनाभर राहिल फ्रेश
Recommended image2
Gold Mangalsutra Designs : साडीवर खुलून दिसतील अशा खास सोन्याच्या मंगळसूत्रांच्या डिझाईन्स
Recommended image3
Pearl Choker : गळ्याला साजेसे मोत्यांचे चोकर, सौंदर्य असं की नजर हटणार नाही
Recommended image4
Anxiety Relief Foods : चिंता आणि ताण कमी करण्यासाठी खा हे 7 पदार्थ
Recommended image5
Ink Stain Removal : पांढऱ्या शर्टवरील शाईचे डाग कसे काढायचे? लॉंड्रीवाल्यांची ही ट्रिक नक्की वापरा
Related Stories
Recommended image1
Christmas 2025 : ख्रिसमवेळी मुलांसाठी खास तयार करा Plum Cake, वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी
Recommended image2
Fried Rice Recipe : रेस्टॉरंटसारखा घरच्याघरी असा तयार करा फ्राइड राइस, वाचा स्टेप बाय रेसिपी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved