बटाट्याच्या रसापासून घरीच तयार करा टोनर, कमी होतील डार्क सर्कल
| Published : Sep 04 2024, 08:23 AM IST
बटाट्याच्या रसापासून घरीच तयार करा टोनर, कमी होतील डार्क सर्कल
Share this Photo Gallery
- FB
- TW
- Linkdin
15
डार्क सर्कलच्या समस्येवर उपाय
डोळ्यांमुळे सौंदर्य अधिक वाढले जाते असे म्हणतात. पण डोळ्यांखाली असणाऱ्या डार्क सर्कलमुळे चारचौघात उभे राहताना लाज वाटते. यावर वेगवेगळे उपाय केले जातात. काहीजण मेकअपच्या माध्यमातून डोळ्यांखालील डार्क सर्कल लपवतात. याचा कालांतराने त्वचेरवर परिणाम झालेला दिसून येऊ शकतो. अशातच केमिकल फ्री प्रोडक्ट्सचा डार्क सर्कलसाठी वापर करू शकता. डोळ्यांखालील डार्क सर्कल दूर करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे बटाट्याचा रस आहे. यापासून टोनर कसे तयार करायचे आणि फायदे काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
25
टोनर तयार करण्यासाठी लागणारी सामग्री
- बटाट्याचा रस अर्धा कप
- 1 चमचा एलोवेरा जेल
- 2-3 थेंब एसेंशियल ऑइल
35
असा तयार करा टोनर
- सर्वप्रथम एक बटाटा घेऊन स्वच्छ धुवा.
- बटाट्यावरील साल काढून टाकत किसून घ्या.
- किसलेला बटाटा सुती कापडात बांधून त्यामधून पाणी काढा.
- बटाट्याचा रस एका वाटीत काढून घ्या.
- बटाट्याच्या रसात एलोवेरा जेल आणि एसेशियल ऑइल मिक्स करा.
- मिश्रण व्यवस्थितीत मिक्स करुन घ्या.
- मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.
45
टोनर लावण्याची पद्धत
- बटाट्याचे टोनर लावण्याआधी चेहरा स्वच्छ धुवा.
- कॉटन पॅडवर टोनर स्प्रे करुन डोळ्यांखाली आलेल्या डार्क सर्कलच्या येथे लावा.
- 15 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा.
55
बटाट्याच्या टोनरचे फायदे
- बटाट्याचे टोनर लावल्याने डार्क सर्कलसह सूज कमी करण्यास मद होऊ शकते.
- बटाट्याचा रस नैसर्गिक रुपात त्वचेला ग्लो आणण्यास मदत करतो. यामुळे त्वचा चमकदार होतो.
- सर्नबर्नच्या समस्येवरही बटाट्याच्या रसाचे टोनर लावू शकता.
- बटाट्यात असणारे अँटीऑक्सिडेंट्स त्वचेला फ्री रेडिकल्सपासून निर्माण होणाऱ्या समस्येपासून दूर ठेवतात.
- बटाट्याचे टोनर चेहऱ्यावरील पिग्मेंटेशनची समस्याही कमी करते.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :