Pitru Paksha 2025 : पितृपक्षात पडणाऱ्या या 6 स्वप्नांचा काय होतो अर्थ?
Pitru Paksha 2025 : पितृ पक्षाच्या काळात, हिंदू परंपरेनुसार स्वप्नांना विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. असं मानलं जातं की, जर पूर्वज स्वप्नात आनंदी दिसले, तर ते त्यांच्या आशीर्वादाचं आणि केलेल्या विधींमुळे समाधानी असल्याचं लक्षण आहे.

स्वप्नात पाणी दिसणे
जर तुम्हाला स्वप्नात पाण्याशी संबंधित गोष्टी दिसल्या, जसं की नदी, तलाव किंवा समुद्र, तर हे एक शुभ स्वप्न असू शकतं. याचा अर्थ असा की, तुमचे पूर्वज तुमच्यावर खुश आहेत आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली आहे.
पूर्वजांना स्वप्नात पांढऱ्या कपड्यात पाहणे
जर तुम्हाला स्वप्नात पूर्वज पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसले, तर याचा अर्थ आहे की तुमचे पूर्वज तुमच्यावर खुश आहेत. अशी स्वप्नं तुमच्या कुटुंबात सुख, समृद्धी आणि शांती येणार असल्याचे संकेत देतात.
पितृ पक्षात फुले आणि फळे दिसणे
जर तुम्हाला स्वप्नात फुले किंवा फळे दिसली, तर हे देखील एक शुभ स्वप्न असू शकतं. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगले परिणाम मिळतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
स्वप्नात पितरांना मिठाई खाऊ घालणे
जर स्वप्नात पूर्वज तुम्हाला मिठाई खाऊ घालत असतील, तर हे देखील एक शुभ स्वप्न असू शकतं. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार आहे आणि तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे.
पितरांना आनंदी मुद्रेत पाहणे
जर स्वप्नात पूर्वज हसताना आणि आनंदी मुद्रेत दिसले, तर याचा अर्थ असा की तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाणार आहात.
पूर्वजांना डोक्याजवळ उभे असलेले पाहणे
जर तुम्ही स्वप्नात एखाद्या पूर्वजाला तुमच्या डोक्याजवळ उभे असलेले पाहिले, तर हा देखील एक शुभ संकेत आहे. कारण याचा अर्थ तुमच्यावर येणारे संकट टळणार आहे आणि पूर्वजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे.
पूर्वजांना जेवण भरवताना पाहणे
जर एखाद्या व्यक्तीला तिचे पूर्वज स्वप्नात जेवण भरवत असतील, तर समजून जा की तुमचा येणारा काळ खूप चांगला असेल.

