MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Skin Care : 'या' फळाचा नैसर्गिक फेसपॅक, आठवड्याभरात ग्लो

Skin Care : 'या' फळाचा नैसर्गिक फेसपॅक, आठवड्याभरात ग्लो

Skin Care Tips : चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहण्यासाठी महिला वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण काही घरगुती उपायांनी देखील चेहऱ्याची चमक दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होऊ शकते. अशातच कोणत्या फळाचा फेसपॅक तुम्ही लावू शकता हे जाणून घेऊया.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Jun 18 2026, 11:41 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
चेहऱ्याच्या ग्लोसाठी खास टिप्स
Image Credit : Getty

चेहऱ्याच्या ग्लोसाठी खास टिप्स

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात धूळ, प्रदूषण, वाढता ताण आणि बदललेल्या लाइफस्टाइलमुळे चेहऱ्यावरील ग्लो कमी झाल्याची तक्रार बहुतांशजण करतात. यासाठी महागडे ब्युटी प्रोडक्ट्स, ट्रिटमेंटचा वापर केला जातो. पण याच्या माध्यमातून दीर्घकाळ चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहत नाही. पण तुम्ही काही घरगुती उपाय केल्यास चेहऱ्यावरील चमक दीर्घकाळ टिकून राहण्यासह त्वचेचे कोणतेही नुकसान होणार नाही. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी पपईचा वापर
Image Credit : stockPhoto

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी पपईचा वापर

चेहऱ्यावरील ग्लो पुन्हा येण्यासाठी पपईचा वापर करू शकता. पपईमध्ये त्वचेसाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन ए, सी आणि पपेन एन्झाइम नावाचे तत्व भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पपईचा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा वापरू शकता.

Related Articles

Related image1
Glowing Skin Care Routine : चमकदार त्वचा हवीये? मग झोपण्यापूर्वी लावा या ५ सोप्या सवयी
Related image2
Skin Care : एसीमुळे त्वचा कोरडी पडतेय? मग तज्ज्ञांनी सांगितलेला हा सोपा उपाय करून बघाच!
36
त्वचेसाठी फायदेशीर पपई
Image Credit : stockPhoto

त्वचेसाठी फायदेशीर पपई

पपईमध्ये असलेले पपेन एन्झाइम तत्त्व त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतात. तसेच व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेतील कोलेजन वाढण्यास मदत होते. अशातच त्वचा अधिक मऊसर, तजेलदार होते. चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग, टॅनिंग कमी होण्यासही मदत होते.

46
असा तयार करा पपईचा फेसपॅक
Image Credit : Getty

असा तयार करा पपईचा फेसपॅक

पपईचा फेसपॅक तयार करण्यासाठी पिकलेल्या पपईचे ३-५ तुकडे घ्या. हे तुकडे व्यवस्थितीत कुस्करुन त्यामध्ये एक चमचा मध आणि अर्धा चमचा दही मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर आणि मानेवर अर्धातास लावून ठेवा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. पपईचा हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा वापरू शकता. यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो येण्यास नक्कीच मदत होऊ शकते.

56
टॅनिंग आणि डाग कमी करण्यासाठी फायदेशीर
Image Credit : stockPhoto

टॅनिंग आणि डाग कमी करण्यासाठी फायदेशीर

उन्हामुळे त्वचेवर आलेले टॅनिंग कमी करण्यासाठी पपई आणि लिंबाच्या रसाचा फेसपॅक फायदेशीर ठरू शकतो. पपईमधील एन्झाइम्स तत्त्व त्वचा खोलवर स्वच्छ करतात. तर लिंबामधील व्हिटॅमिन सी तत्त्वामुळे त्वचेला ग्लो येण्यास मदत होते. मात्र संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींनी लिंबाचा कमी करावा.

66
फेसपॅक लावण्यापूर्वी घ्या काळजी
Image Credit : stockPhoto

फेसपॅक लावण्यापूर्वी घ्या काळजी

पपईचा फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवावा. कोणत्याही प्रकारची अॅलर्जी किंवा त्वचेसंबंधित समस्या आधी हाताच्या त्वचेवर पॅच टेस्ट करू पाहा. फेसपॅक धुतल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावा. जेणेकरुन त्वचा कोरडी न राहता हाइड्रेट राहण्यास मदत होईल.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Wash Sneakers In Washing Machine : वॉशिंग मशीनमध्ये शूज धुताय? मग या चुका टाळा
Recommended image2
Sweet Potato Benefits : रताळे खाण्याचे 7 भन्नाट फायदे
Recommended image3
Dates Soaked In Milk : दुधात भिजवलेले खजूर खाण्याचे 7 भन्नाट फायदे
Recommended image4
Blood Pressure Control Diet : बीपी कंट्रोलमध्ये ठेवायचाय? मग आहारात करा या 7 पदार्थांचा समावेश
Recommended image5
Kidney Damage Symptoms : किडनी खराब होण्याआधी शरीर देतं 'ही' पूर्वसूचना, दुर्लक्ष करू नका
Related Stories
Recommended image1
Glowing Skin Care Routine : चमकदार त्वचा हवीये? मग झोपण्यापूर्वी लावा या ५ सोप्या सवयी
Recommended image2
Skin Care : एसीमुळे त्वचा कोरडी पडतेय? मग तज्ज्ञांनी सांगितलेला हा सोपा उपाय करून बघाच!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved