WELCOME 2026 : दिल्ली ते पुणे, देशभरात नवीन वर्षाचे स्वागत करताना जोरदार जल्लोष!
New Year 2026 Celebrations Across India : भारतासह अनेक देशांमध्ये नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी दिल्ली, चंदीगड, मुंबई, बंगळूरू, हैदराबाद, भोपाळ, जयपूर, लखनौ, पाटणा, अहमदाबाद, पुणे यांसारख्या शहरांमध्ये लोकांनी जोरदार आतषबाजी केली.

संपूर्ण देशाने रंगीबेरंगी पार्ट्या आणि शानदार सोहळ्यांसह 2026 चे स्वागत केले. देशाने नवीन वर्षात पदार्पण करताच, देशातील सर्व मोठी शहरे आतषबाजी, सांस्कृतिक कार्यक्रम, लाइव्ह म्युझिकल कॉन्सर्ट आणि थीमवर आधारित सजावटीने उजळून निघाली.
नवीन वर्षाच्या निमित्ताने दिल्लीतील इंडिया गेट, हौज खास, कनॉट प्लेससह अनेक परिसर 2026 च्या आगमनाचा आनंद साजरा करणाऱ्या लोकांनी गजबजलेले दिसले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देश-विदेशातील नागरिकांना 2026 च्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी हा प्रसंग नवी ऊर्जा, सकारात्मक बदल आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक असल्याचे म्हटले. 2026 हे वर्ष सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येवो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
नवीन वर्षाच्या निमित्ताने बंगळूरूच्या महात्मा गांधी रोड आणि ब्रिगेड रोडच्या गजबजलेल्या चौकांमध्ये लोकांची मोठी गर्दी जमली होती. लोकांनी नाचून-गाऊन नवीन वर्षाचे स्वागत केले.
बुधवारी, 31 डिसेंबरच्या रात्री अहमदाबादच्या सीजी रोडवर नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जमलेले लोक.
बुधवारी पटियालामध्ये महिलांच्या एका गटाने नवीन वर्ष 2026 चे स्वागत करण्यासाठी अशाप्रकारे हसतमुखाने सेल्फी काढला.
आंतरराष्ट्रीय सँड आर्टिस्ट मानस कुमार साहू यांनी बुधवारी पुरी येथे वाळूची कलाकृती तयार करून नवीन वर्षाचे स्वागत केले आणि जगाला हॅपी न्यू इयर 2026 च्या शुभेच्छा दिल्या.
पुण्यातील एमजी रोड परिसरात आकाशात फुगे सोडून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.

