NEET UG 2026 Revised Syllabus Released by NTA : नॅशनल मेडिकल कमिशन अंतर्गत अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्डाने मंजूर केलेला अभ्यासक्रम NTA च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

NEET UG 2026 Revised Syllabus Released by NTA :नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) 2026 च्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET UG) परीक्षेसाठी सुधारित अभ्यासक्रम जाहीर केला आहे. नॅशनल मेडिकल कमिशन अंतर्गत अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्डाने (UGMEB) मंजूर केलेला हा अभ्यासक्रम NTA च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी नवीन अभ्यासक्रमानुसार आपले अभ्यासाचे साहित्य तयार करावे, अशी सूचना NTA ने दिली आहे. परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.