MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Navratri 2026 Astrology : नवरात्री २०२६; दुर्गा देवी हत्तीवर स्वार होऊन येणार, या 4 राशींना मिळणार बंपर फायदा

Navratri 2026 Astrology : नवरात्री २०२६; दुर्गा देवी हत्तीवर स्वार होऊन येणार, या 4 राशींना मिळणार बंपर फायदा

नवरात्री २०२६ आजपासून सुरू होत आहे. यंदा दुर्गा देवी हत्तीवर स्वार होऊन येणार आहे. हत्ती हे सुख-समृद्धीचे प्रतीक असून या ४ राशींना मोठा फायदा होईल.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 11 2026, 08:50 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
दुर्गा देवीच्या आगमनाने या राशींना होणार फायदा
Image Credit : AI Image

दुर्गा देवीच्या आगमनाने या राशींना होणार फायदा

भारतात नवरात्रीचा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुर्गा देवीच्या उपासनेसाठी हा सण खास मानला जातो. यंदा शारदीय नवरात्री ११ ऑक्टोबरला सुरू होऊन २० ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी संपेल. या नऊ दिवसांत भाविक देवीच्या विविध रूपांची पूजा करतात आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. नवरात्रीत दुर्गा देवी कोणत्या वाहनावर स्वार होऊन येते, याला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
हत्तीवर स्वार होऊन येणार देवी
Image Credit : Asianet News

हत्तीवर स्वार होऊन येणार देवी

नवरात्रीची सुरुवात आणि सांगता आठवड्याच्या कोणत्या दिवशी होते, यावरून देवीचं वाहन ठरतं. २०२६ मध्ये नवरात्रीची सुरुवात रविवारी होत आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार यंदा दुर्गा देवी हत्तीवर स्वार होऊन येणार आहे. देवी हत्तीवर येणं हे खूप शुभ मानलं जातं. यामुळे सुख, शांती आणि आर्थिक प्रगती होते, अशी मान्यता आहे. याच पार्श्वभूमीवर काही विशिष्ट राशींना याचा मोठा फायदा होऊ शकतो.

Related Articles

Related image1
Numerology 2026 : पुढचे ५ महिने 'या' मूलांकाच्या व्यक्तींचे अच्छे दिन, गुरुच्या राशी बदलाने नशीब पालटणार
36
तूळ रास
Image Credit : Getty

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी ही नवरात्री कौटुंबिक सुख आणि शांती घेऊन येईल. कुटुंबात काही मतभेद असतील, तर ते शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. घर किंवा गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर तुमचं उत्पन्न आणि बजेट तपासून मगच निर्णय घ्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं आणि स्पर्धा परीक्षांची चांगली तयारी करणं गरजेचं आहे.

46
धनु रास
Image Credit : Getty

धनु रास

ज्योतिषशास्त्रानुसार, ही नवरात्री धनु राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगतीची दारं उघडेल. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामं आता पूर्ण होतील. व्यवसायात नवीन संधी शोधण्यासाठी आणि उत्पन्नाचं योग्य नियोजन करण्यासाठी हा काळ खूप चांगला राहील.

56
कुंभ रास
Image Credit : Getty

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी नोकरी, नवीन व्यवसाय आणि परदेशवारीच्या दृष्टीने हा काळ खूप आशादायी असेल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी स्वतःचं कौशल्य वाढवून नवीन संधींसाठी प्रयत्न करावेत. परदेशात जाण्याचा विचार करत असाल, तर कागदपत्रं आणि खर्चाचं आधीच नियोजन करून ठेवा.

66
मीन रास
Image Credit : Getty

मीन रास

मीन राशीच्या लोकांनी या काळात कर्जाचं ओझं कमी करण्यावर आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यावर भर द्यावा. अचानक पैसा मिळेल या आशेवर आधीच खर्च करू नका. आर्थिक निर्णय घेताना योग्य माहिती घेऊनच पाऊल उचला. या चारही राशींना मिळणारे फायदे हे पूर्णपणे ज्योतिषशास्त्रीय मान्यतेवर आधारित आहेत.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Today 11th October Horoscope : कोणचा जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल, तर कोणाला मिळेल आनंदाची बातमी; कसा असेल 12 राशींचा आजचा दिवस?
Recommended image2
Navratri 2026 : पहिल्या दिवशी केशरी रंग का असतो खास? जाणून घ्या स्टायलिंग टिप्स
Recommended image3
Daily Horoscope: मेष ते मीन राशींसाठी कसा असेल रविवार? एका क्लिकवर जाणून घ्या तुमचे भविष्य
Recommended image4
Lemon Peel Uses : लिंबाची साल फेकून देताय? थांबा! हे ८ भन्नाट उपयोग नक्की पाहा
Recommended image5
Navratri 2026 : गरबा नाईटसाठी ट्राय करा हे ५ बॉलिवूड आय मेकअप लुक्स
Related Stories
Recommended image1
Numerology 2026 : पुढचे ५ महिने 'या' मूलांकाच्या व्यक्तींचे अच्छे दिन, गुरुच्या राशी बदलाने नशीब पालटणार
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved