Navratri 2025 : शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलीपुत्रीची पूजा केली जाते. हिमालयाची कन्या आणि भगवान शिवाची पत्नी म्हणून तिची ओळख आहे. त्रिशूल आणि कमळ धारण केलेली ही देवी स्थैर्य, साधना आणि नवजीवनाचे प्रतीक मानली जाते. 

येत्या 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. यादरम्यान देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांची पूजा केली जाते. नवरात्रीत असणाऱ्या पहिल्या माळेवेळी देवी शैलीपुत्रीची पूजा केली जाणार आहे. अशातच शैलीपुत्रीची पूजा करण्याची विधी, मंत्र आणि नियम याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

देवी शैलीपुत्री

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलीपुत्रीची पूजा केली जाते. हिमालयाला संकित भाषेत शैल असे म्हटले जाते. अशातच देवी हिमालयात निवास करत असल्याने तिला शैलीपुत्री असे नाव पडले. देवी शैलीपुत्रीला वृषोरुढा, सती, हेमवती, उमा अशा नावांनीही ओखळले जाते. देवी शैलीपुत्रीच्या कृपेमुळे व्यक्तीमध्ये तपस्याचे गुण निर्माण होतात.

देवी शैलीपुत्रीचे स्वरुप

देवी शैलीपुत्रीचे वर्णन करायचे झाल्यास तिचे रुप शुभ्र रंगातील आहे. देवीने श्वेत रंगाचे वस्रही धारण केले आहेत. देवीचे वाहन बैल आहे. देवी शैलीपुत्रीच्या डाव्या हातात त्रिशूळ आणि उजव्या हातात कमळ आहे. देवीचे हे रुप सौम्यता, करुणा, स्नेह आणि धैर्याचे दर्शन घडवून आणते.

देवी शैलीपुत्रीच्या पूजेवेळी म्हणा मंत्र

ऊँ देवी शैलपुत्र्यै नमः ।।

या देवी सर्वभूतेषु शैलपुत्री रूपेण संस्थिता। नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:।।

वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्। वृषारुढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्।।

देवी शैलीपुत्रीला आवडता नैवेद्य

देवी शैलीपुत्रीला पांढऱ्या रंगातील पदार्थ जसे की, खीर, पांढऱ्या रंगातील मिठाईचा नैवेद्य दाखवू शकता.

देवी शैलीपुत्रीची कथा

देवी शैलीपुत्रीच्या रुपाबद्दल एक पौराणिक कथा प्रचलित आहे. देवीबद्दल असे सांगितले जाते की, ज्यावेळी माता पार्वतीच्या रुपात पुर्नजन्म घेतला होता तेव्हा ती मनुष्य रुपात होती. भगवान शंकरासमान दैवीय अवतार धारण करणे आणि त्यांना पतीच्या रुपात प्राप्त करण्यासाठी मातेने घोर तपस्या केली होती. यानंतर भगवान शंकराने तिला आपल्या अर्धांगिनीच्या रुपात मानले होते. असे मानले जाते की, माता पार्वतीचे याच तपस्वी रुपाला देवी शैलीपुत्रीच्या नावाने ओखळले जाते.