Navratari 2024: राशीनुसार करा उपाय, आयुष्यातील संकटे दूर होऊन येईल सुख-समृद्धी

| Published : Oct 02 2024, 12:21 PM IST

Daily Horoscope
Navratari 2024: राशीनुसार करा उपाय, आयुष्यातील संकटे दूर होऊन येईल सुख-समृद्धी
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Navratari 2024 : यंदा शारदीय नवरात्रौत्सवाला 3 ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे. या नऊ दिवसात राशीनुसार उपाय केल्यास तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकतात. याशिवाय देवीचे आशीर्वादही मिळतील.

Navratari 2024 Upay as per Rashi : प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रौत्सव साजरी केली जाते. यंदा शारदीय नवरात्रौत्सवाला 3 ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार असून 11 ऑक्टोंबरला असणाऱ्या दसऱ्यला उत्सव संपणार आहे. या नवरात्रीत राशीनुसार उपाय केल्यास देवीचे आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहतील. याशिवाय घरातील संकटे दूर होत सुख-समृद्धीही येईल.

मेष राशी
मेष राशीचा स्वामी मंगळदेव आहे. नवरात्रीवेळी या राशीच्या व्यक्तींना देवीला लाल रंगातील वस्र आणि श्रृंगाराच्या वस्तू अर्पण कराव्यात. यानंतर वस्तू एखाद्या ब्राम्हण स्री ला दान करा. यामुळे देवीची कृपा तुमच्यावर राहिल.

वृषभ राशी
वृषभ राशीचा स्वामी शुक्रदेव आहे. शारदीय नवरात्रौत्सवावेळी या राशीतील व्यक्तींना देवी सोनेरी किंवा सिल्व्हर रंगातील रंगाचे वस्र अर्पण करा. दूधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास देवी महागौरीच्या मंत्राचा जाप करावा.

मिथुन राशी
मिथुन राशीचा स्वामी बुधदेव आहे. या व्यक्तींनी नवरात्रीत देवीला हिरव्या रंगातील वस्र आणि बांगड्या अर्पण करा. हिरव्या रंगातील फळांचाही नैवेद्य दाखवा. मिथुन राशीतील व्यक्तींनी देवी सिद्धिदात्रीची पूजा करावी.

कर्क राशी
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीच्या व्यक्तींनी देवी चंद्रघंटाची पूजा करावी. नवरात्रीत देवीला पांढऱ्या रंगाती पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. याशिवाय गरजूंना तांदूळ, साखरेचे दान करावे.

सिंह राशी
सिंह राशीचा स्वामी भगवान सुर्यदेव आहे. या राशीतीत व्यक्तींनी कोणत्याही मंदिरात केशरी रंगाचा ध्वज लावा. शक्य नसल्यास घरच्याघरीही केशरी रंगातील ध्वज लावू शकता. केशरयुक्त मिठाई, खीर किंवा दूधाचा नैवेद्य देवीला दाखवावा.

कन्या राशी
कन्या राशीचा स्वामी बुधदेव आहे. नवरात्रीत दररोज दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. ब्राम्हणांना घरी भोजनासाठी बोलवाले आणि हिरव्या रंगातील साडी आणि बांगड्या अर्पण करा.

तुळ राशी
तुळ राशीचा स्वामी शुक्रदेव आहे. या राशीतील व्यक्तींनी देवी महागौरीची पूजा करावी. देवीला पांढऱ्या रंगातील फुलांचा हार, ड्राय फ्रुट्सचा नैवेद्य दाखवावा. यामुळे अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील.

वृश्चिक राशी
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीतील व्यक्तींनी देवी सिद्धिदात्रीची पूजा करावी. देवीला लाल रंगातील फुल अर्पण करा. याशिवाय देवीला गुळापासून तयार केलेली मिठाई नैवेद्य दाखवा.

धनु राशी
धनु राशीचा स्वामी गुरु आहे. शारदीय नवरात्रौत्सवावेळी या राशीतील व्यक्तींनी देवीला पिवळ्या रंगातील फूलांचा हार, पिवळ्या रंगातील वस्र अर्पण करा. यामुळे आयुष्यात सुख-समृद्धी येईल.

मकर राशी
मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. या राशीतील व्यक्तींनी देवी कालरात्रीची पूजा करावी. याशिवाय दुर्गाकवचचे पठण करावे. देवीला प्रसन्न करण्यासाठी गडद रंगातील मिठाईचा नैवेद्य दाखवावा.

कुंभ राशी
कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. या राशीच्या व्यक्तींनी देवीला निळ्या रंगातील साडी अर्पण करा. तीळ आणि शेंगदाण्यापासून तयार केलेल्या गोड पदार्थांचा नैवेद्य देवीला दाखवा,

मीन राशी
मीन राशीचा स्वामी देवगुरु गुरु आहे. नवरात्रीवेळी या राशीतील व्यक्तींना देवीच्या फोटोला केशरयुक्त दूधाने अभिषेक करावा. याशिवाय देवीच्या मंत्राचा जपही करावा.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read more Articles on