नाश्तासाठी पौष्टिक असे हिरव्या मुगाचे आप्पे, पाहा रेसिपी स्टेप बाय स्टेप

| Published : Aug 29 2024, 11:02 AM IST

Green Moong Appe
नाश्तासाठी पौष्टिक असे हिरव्या मुगाचे आप्पे, पाहा रेसिपी स्टेप बाय स्टेप
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Moong Appe Recipe :  नाश्तासाठी दररोज काय करायचे असा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. अशातच पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला असल्यास पौष्टिक असे हिरव्या मुगाचे आप्पे तयार करू शकता. पाहूया संपूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप सविस्तर...

Green Moong Appe Recipe : नाश्तासाठी किंवा मुलांच्या डब्याला काय द्यायचे असा प्रश्न पडतोच. दररोज नवीन पदार्थ तयार करण्याची आवड असल्यास नाश्तासाठी हिरव्या मुगाचे आप्पे तयार करु शकता. अगदी झटपट आणि कमी तेलात होणाऱ्या हिरव्या मुगाच्या आप्पेसाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया सविस्तर…

साहित्य:

  •  कप भिजवलेले हिरवे मूग (रात्री भिजवलेले)
  • 2 इंच आले
  • 2 हिरव्या मिरच्या
  • 1 मध्यम आकाराची शिमला मिर्च
  • 1 बारीक चिरलेला कांदा
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ

कृती : 

  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले हिरवे मूग काढून घ्या. 
  • मिक्सरच्या भांड्यात आलं, हिरव्या मिरच्या, मीठ आणि हिरवे मूग बारीक वाटून घ्या.
  • एका भांड्यात आप्पेसाठी तयार केलेली पेस्ट काढून घ्या.
  • मिश्रणामध्ये कोथिंबीर, शिमला मिर्च आणि कांदा असे सर्व साहित्य व्यवस्थितीत मिक्स करा. 
  • आप्पेच्या भांड्यात तेल सोडून मिश्रण त्यामध्ये घाला. 
  • आप्पे 4-5 मिनिटांसाठी भाजण्यासाठी ठेवा. दोन्ही बाजूने आप्पे व्यवस्थितीत भाजून घ्या.
  • आप्पे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये हिरव्या मिरचीची चटणी अथवा सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करा. 

पाहा हिरव्या आप्पेची सोपी रेसिपी (VIDEO)

View post on Instagram
 

 

आणखी वाचा : 

Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाच्या नैवेद्यासाठी 5 मोदकाचे प्रकार, पाहा रेसिपी

अंड की पनीर, कोणत्या पदार्थातून मिळते अधिक प्रोटीन?