Payment Tips: QR कोडच्या मदतीने पेमेंट करताना 'या' स्मार्ट टिप्स नक्की वापरा, कारण…
- FB
- TW
- Linkdin
क्युआर पेमेंटसाठी स्मार्ट टिप्स
Payment Tips: तुम्हाला कधी एखाद्या लॉटरीसाठी क्युआर कोड मिळाला आहे का? तसंच फ्री मोबाइल रिचार्ज करण्यासाठी फ्रेंड्स ग्रुपमध्ये लिंक अथवा स्कॅनर शेअर करण्याचा मेसेज फोनवर मिळाला आहे का. तर मित्रांनो अशा ऑफर्सपासून जरा सावधच राहा. चुकूनही तुम्ही एखादा क्युआर कोड स्कॅन केलाच तर मग तुमचे बँक खाते पूर्णपणे रिकामे होण्याची शक्यता आहे. तुम्ही वाचताय, ते अगदी बरोबर आहे. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास हे समस्या टाळणं नक्कीच शक्य आहे.
डिजिटलच्या युगात हल्ली सर्वचजण कॅशलेस व्यवहार करण्यावर भर देत आहेत. फक्त एक क्युआर कोड स्कॅन केला की आपल्या खात्यातून थेट दुसऱ्याच्या खात्यात पैशांचा व्यवहार करणं सोपे झाले आहे. पण या प्रक्रियांमध्ये धोके देखील तितकेच आहेत. कॅशलेस व्यवहार करताना कित्येकांची बँक खाती रिकामी झाल्याची प्रकरणं दर दिवशी समोर येत आहेत. म्हणूनच ऑनलाइन व्यवहार करताना कष्टाने कमावलेले पै-पै आपल्याच चुकांमुळे गमावण्याची वेळ येऊ नये, यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. यासाठी काही साध्या-सोप्या टिप्स लक्षात ठेवणे गरजेचं आहे, जाणून घेऊया सविस्तर माहिती…
ओळखीच्याच दुकानातून करा खरेदी
काही कारणास्तव तुम्हाला एखाद्या नवीन दुकानातून खरेदी करण्याची वेळ आल्यास त्यापूर्वी संबंधित दुकानाबाबत प्राथमिक माहिती मिळवा. तेथून घरातील किराणामाल किंवा दैनंदिन वापरातील उपयोगी वस्तू खरेदी करण्यापूर्वी दुकानाबाबत प्रथम ऑनलाइन रिव्ह्यू जाणून घ्या. यानंतरच तेथून खरेदी करा.
सुरक्षित क्युआर कोड आणि डिव्हाइस स्कॅन करा
क्युआर कोड स्कॅन करण्यापूर्वी (QR code payment tips) त्याचा वापर करणं खरंच सुरक्षित आहे का? हे सर्वप्रथम जाणून घ्या. आपला मोबाइल फोन देखील सुरक्षित असणे तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा फोनमधील महत्त्वपूर्ण डेटा गहाळ होण्याची शक्यता आहे. यासाठी मोबाइलमध्ये अंक, अक्षरे एकत्रित करून स्ट्राँग पासवर्ड ठेवावा. तसेच अँटी - व्हायरस सॉफ्टवेअरचाही वापर करावा.
क्युआर कोडच्या फसवणुकीपासून असे राहा दूर
- केवळ अधिकृत क्युआर स्कॅनिंग अॅपचा वापर करावा
- आपला स्मार्टफोन व अॅप नेहमीच अपडेटेड ठेवा
- क्युआर कोड स्कॅन करण्यापूर्वी तो आपल्या कामाचा आहे की नाही? हे तपासून पाहा
- क्युआर कोड स्कॅन करताना सतर्क राहा आणि खासगी माहिती कोणालाही शेअर करू नका (Payment through QR code)
- कोणत्याही अज्ञात क्युआर कोडच्या माध्यमातून पेमेंट करणे टाळा
ही चूक करणे टाळा
कधी-कधी अनोळखी क्रमाकांवरूनही क्युआर कोड इमेज मेसेजद्वारे पाठवली जाते. पण जर तुम्हाला कोड पाठवणाऱ्या व्यक्तीबाबत काहीही माहिती नसल्यास कोड स्कॅन करण्याची चूक करू नका. तसेच लगेचच तो नंबर ब्लॉक करावा. मुळात संशयास्पद क्रमांकावरून फोन/ मेसेज येणाऱ्या लोकांशी कोणत्याही प्रकारे बातचित करणे टाळा. युपीआय पिन देखील कोणासोबतही शेअर करू नका.
आणखी वाचा:
Threads Big Update : इंस्टाग्रामला गुडबाय न म्हणता आता थेट डिलीट करू शकता Threads Account
सावधान! रात्रीच्या वेळेस केळे खाताय? आरोग्यास होतील हे अपाय
VIDEO कोयता किंवा मशीनचा वापर न करता कसा फोडावा नारळ? पाहा सोपी पद्धत