सावधान! रात्रीच्या वेळेस केळे खाताय? आरोग्यास होतील हे अपाय
काही जणांना रात्रीच्या वेळेस केळे खाण्याची सवय असते. तर काही जण रात्रीच्या वेळेस केळे खाणे टाळतात.
तुम्हालाही रात्रीच्या वेळेस केळे खाण्याची सवय असेल, तर यामुळे शरीरास कोणकोणते अपाय होऊ शकतात? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
केळे या फळामध्ये कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, फॉस्फरस यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. केळे खाणे शरीरासाठी पोषकही आहे. पण चुकीच्या वेळेस केळे खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
हिवाळ्यामध्ये केळे खाल्ल्यास सर्दी-खोकला यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतात.
रात्रीच्या वेळेस केळे खाल्ल्यास कफची समस्या निर्माण होते. यामुळे घशाशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात.
केळ्यामध्ये फायबर व कॅल्शिअमसह पोटॅशिअम देखील असते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस या सर्व घटकांचे पचन होणे कठीण ठरू शकते. ही समस्या टाळण्यासाठी सकाळच्या वेळेस केळे खावे.
कधीही रिकाम्या पोटी केळे खाऊ नये. कारण यामुळे रक्तातील कॅल्शिअम व मॅग्नेशिअमच्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो.
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.