- Home
- lifestyle
- Mercury Transit in Leo : बुध या ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केल्याने कोणत्या राशींना होईल फायदा?
Mercury Transit in Leo : बुध या ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केल्याने कोणत्या राशींना होईल फायदा?
मुंबई - ३० ऑगस्टपासून बुध हा ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींना अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तर काहींना त्याचा फायदाही होऊ शकतो. जाणून घ्या सविस्तर माहिती.

मेष राशी
बुध सिंह राशीत गेल्याने मेष राशीच्या लोकांना संकटांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबात वाद आणि आर्थिक समस्या येऊ शकतात. त्यामुळे मन स्थीर ठेवा. आतापासून याचे प्लानिंग करा. समस्यांवर मात करा.
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात नफा मिळवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. पण या काळात मिळालेला नफा तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल. त्याचा फायदा पुढील आयुष्यात होईल. आईच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांना फारशी प्रगती होणार नाही. त्यामुळे तुम्हाला बरेच कष्ट घ्यावे लागतील. या कष्टातून अनेक अनुभव येतील. हेच अनुभव तुमची संपत्ती बनेल. स्वभावामुळे आणि पैशाच्या बाबतीत समस्या येऊ शकतात.
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांना व्यवसायात नुकसान, जोडीदाराशी मतभेद आणि आरोग्यात चढ-उतार येऊ शकतात. कौतुंबिक वातावरण समाधानकारक न राहिल्याने चिडचिड होईल. पण परिस्थितीला संयमाने समोरे जा. संकटांवर मात करा.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांना करिअरमध्ये अडथळे आणि व्यक्तिमत्त्वाबाबत गैरसमज होऊ शकतात. पण या काळात तुमचा आत्मविश्वास गमवू नका. कालांतराने यश तुमची वाट बघत उभे आहे. ते तुम्हाला निश्चितच मिळेल.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांना वाद, तणाव, आरोग्य समस्या आणि करिअरमध्ये आव्हाने येऊ शकतात. कितीही ताणतणावर आला तरी मानसिक संतुलन ढळू देऊ नका. शांततेने विचार करा. आपल्या प्रायोरिटीज सेट करा. त्यातून मार्ग काढा.
कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये समस्या आणि चढ-उतार येऊ शकतात. असे असले तरी कष्ट करत राहा. एक काळ असा येईल की तुम्ही हात घालाल ते सोने होईल. तुमचे करिअरही सोन्यासारखे झाळाळेल. तुम्हाला हवे ते मिळेल.

