सार
चिप्स खाण्याची आवड कुणाला नसते? स्नॅक्सच्या स्वरूपात आपण बर्याचदा बाहेरून बटाट्याचे चिप्स किंवा केळीचे चिप्स विकत घेतो. मात्र, हे केवळ आपल्या खिशाला झळ पोहोचवतेच असे नाही, तर आरोग्यासाठीही योग्य नसते. येथे आम्ही तुम्हाला घरी दक्षिण भारतीय स्टाईलचे केळ्याचे चिप्स बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हे संध्याकाळच्या स्नॅक्सकासाठी एक परफेक्ट पर्याय ठरते. चला तर मग जाणून घेऊया घरी केळीचे चिप्स बनवण्याची सोपी रेसिपी:
केळ्याचे चिप्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- ४-५ कच्ची केळी
- २-४ कप पाणी
- २ मोठे चमचे मीठ
- १ छोटा चमचा हळद पावडर
- २ कप नारळाचे तेल
केळ्याचे चिप्स बनवण्याची पद्धत
१. केळी सोलून कापा:
कच्ची केळी घ्या आणि त्यांची सालं व्यवस्थित सोलून घ्या. नंतर पातळ आणि समान आकाराच्या चकत्या कापा. लक्षात ठेवा, चकत्या पातळ आणि सारख्या असाव्यात जेणेकरून त्या नीट फ्राय होतील.
आणखी वाचा- तुम्ही दिवसभर जास्त खाणे टाळाल! या ७ फळांचा आहारात करा समावेश
२.चकत्या भिजवून ठेवा:
एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात मीठ व हळद पावडर मिसळा. त्यामध्ये केळ्याच्या चकत्या १०-१५ मिनिटांसाठी भिजवून ठेवा.
३.अतिरिक्त पाणी काढून टाका:
१०-१५ मिनिटांनंतर चकत्यांमधील अतिरिक्त पाणी काढून टाका आणि त्या किचन पेपरवर ठेवा, जेणेकरून त्यातील ओलावा निघून जाईल.
४.डीप फ्राय करा:
एका कढईत मध्यम आचेवर नारळाचे तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात केळ्याच्या चकत्या टाका आणि त्या सोनेरी तपकिरी व कुरकुरीत होईपर्यंत डीप फ्राय करा.
आणखी वाचा- गरम पाणी पिल्यामुळे वजन कमी होत का, पाणी पिण्याची पद्धत जाणून घ्या
५.चिप्सला सीझन करा:
फ्राय केलेल्या चिप्सला कढईतून बाहेर काढून किचन पेपरवर ठेवा, जेणेकरून उरलेले तेल निघून जाईल. थंड झाल्यानंतर त्यात थोडेसे मीठ घालून चांगले मिसळा आणि एअरटाइट कंटेनरमध्ये साठवा. हे चिप्स तुम्ही कोणत्याही गिल्टशिवाय खाऊ शकता. हे एक हेल्दी स्नॅक्स पर्याय आहे. लहान मुलं, मोठे किंवा वृद्ध व्यक्ती, सगळ्यांनाच हे कुरकुरीत चिप्स खाण्यासाठी आवडतील.