सार
बेसन धिरडं
नाश्त्यासाठी तुम्हाला काहीतरी हेल्दी आणि चविष्ट खायचे असल्यास, बेसनचे पीठ बनवून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आवडत्या भाज्या आणि मसाले मिसळा. त्यानंतर तव्यावर पसरवून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. हे बेसन धिरडं चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.
भजी
अडीचशे ग्रॅम बेसनपासून तुम्ही स्नॅक्ससाठी स्वादिष्ट भजी बनवू शकता. बेसनात बटाटा, कांदा, पालक किंवा ब्रेडचे तुकडे बुडवून डीप फ्राय करा आणि सकाळी गरमागरम चहासोबत याचा आनंद घ्या.
ढोकळा
जर तुम्हाला हलकं आणि स्वादिष्ट स्नॅक्स ट्राय करायचं असेल, तर तुम्ही गुजराती ढोकळाही बनवू शकता. हा हलका, फुललेला आणि स्पंजी प्रकार असतो, जो वाफवून तयार केला जातो आणि वरून तडका दिला जातो.
आणखी वाचा- भाज्या ताज्या ठेवण्याचे सोपे उपाय; एक आठवड्यापर्यंत राहतील ताज्या
खमण
खमण हा ढोकळ्यासारखाच असतो, पण तो अधिक मऊसर असतो. यावर साखरेच्या पाण्याचा शिडकावा केला जातो, ज्यामुळे तो अधिक रसरशीत होतो. याला वरून लिंबू आणि हिरव्या मिरच्यांचा तडका दिला जातो.
खांडवी
खांडवी ही एक गुजराती डिश आहे. बेसन आणि दह्याच्या घोळाला शिजवून थाळीवर पसरवून त्याचे गोल रोल तयार केले जातात. यावर सुके नारळ आणि राईचा तडका लावला जातो.
शेव
बेसनात मीठ, तेल आणि काही मसाले घालून पीठ मळा. नाजूक छिद्र असलेल्या मशीनमधून शेव किंवा भुजिया तयार करा. हा चहासोबत परफेक्ट स्नॅक आहे आणि तुम्ही तो अनेक दिवस साठवू शकता.
आणखी वाचा- चहा vs ग्रीन टी: आरोग्यासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
बेसन भरलेली मिरची
जर तुमच्याकडे मोठ्या मिरच्या असतील, तर त्यांना उभा चिरा द्या आणि आत आलूची सारण भरा. यानंतर मिरची बेसनाच्या घोळात बुडवून डीप फ्राय करा. तुमचे बेसन मिरची पकोडे तयार आहेत.