सार

Makar Sankranti Special Recipe : घरच्या घरी गुळाची पोळी कशी तयार करावी? जाणून घ्या या पदार्थाची पाककृती…

Makar Sankranti Special Recipe : मकर संक्रांत (Makar Sankranti 2024) सणासाठी काही जण नैवेद्यासाठी पुरणपोळी व्यतिरिक्त गूळपोळी (Gul Poli) हा गोड पदार्थ देखील करतात. चवीला स्वादिष्ट असणारी गूळपोळी (Gul Poli) आरोग्यासाठीही तितकीच पोषक असते. 

योग्य प्रमाणात गुळाचे सेवन केल्यास शरीरास अनेक लाभ मिळू शकतात. गुळातील पोषणतत्त्वांमुळे शरीराला ऊर्जा मिळण्यापासून ते शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघण्यासही मदत मिळते. चला तर जाणून घेऊया गूळपोळीची सोपी रेसिपी…

सामग्री

कणिक

  • गव्हाचे पीठ - एक कप
  • मैदा - अर्धा कप
  • रवा - ¼ कप
  • बेसन - दोन ते तीन चमचे
  • मीठ - चवीपुरते
  • तेल - तीन ते चार चमचे
  • पाणी - आवश्यकतेनुसार

सारण तयार करण्यासाठी लागणारी सामग्री

  • बेसन - दोन ते तीन चमचे
  • पाणी/ तेल - आवश्यकतेनुसार
  • गूळ - अर्धा कप
  • शेंगदाण्याची पावडर - ¼ कप
  • भाजलेल्या तिळाची पावडर - ¼ कप
  • वेलची पूड
  • तांदळाचे पीठ

पाककृती

कणिक कसे तयार करावे?

गव्हाचे पीठ, मैदा, रवा, बेसन, मीठ आणि तेल एका भांड्यांमध्ये एकत्रित घ्या व त्यामध्ये थोडेसे पाणी मिक्स करून कणिक मळून घ्या. पीठ थोडेसे घट्ट मळावे. कणिक मळून झाल्यानंतर ते ओल्या कापडाने 30 मिनिटांसाठी झाकून ठेवा.

गूळपोळीचे सारण

  • गॅसच्या मध्यम आचेवर पॅन गरम होण्यास ठेवा.
  • बेसन नीट भाजून घ्या आणि त्यामध्ये थोडेसे तेल मिक्स करा.
  • दोन्ही सामग्री नीट एकजीव करा. बेसन नीट भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या.
  • यानंतर पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवावे आणि त्यामध्ये गूळ मिक्स करावा.
  • गूळ पूर्णपणे विरघळू द्यावा.
  • गूळ विरघळल्यानंतर गॅस बंद करावा व त्यामध्ये तेल मिक्स करावे.
  • यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर, भाजलेल्या तिळाची पावडर आणि भाजलेले बेसनही मिक्स करावे.
  • सर्व सामग्री एकजीव करा आणि त्यानंतर वेलची पूड मिक्स करावी.
  • सर्व सामग्री व्यवस्थित एकजीव करा आणि सारण थंड होऊ द्यावे.
  • मिश्रण थोडेसे गरम असतानाच एकजीव करून घ्यावे. गूळपोळीचे सारण तयार आहे.

गूळपोळी (Gul Poli)

  • सारणाचे छोटे गोळे तयार करा.
  • कणिक पुन्हा मळा आणि त्याचेही छोटे गोळे तयार करा.
  • पोळी लाटा त्यावर सारणाचा गोळा पसरवावा.
  • पुन्हा दुसरी पोळी लाटून त्यावर ठेवा आणि व्यवस्थित पोळी लाटावी.
  • पोळी लाटताना तांदळाच्या पिठाचा वापर करावा.
  • गूळपोळी (Gul Poli) लाटून झाल्यानंतर गरम तव्यावर व्यवस्थित शेकावी.
  • गरमागरम गूळपोळीचा तुपासोबत आस्वाद घ्यावा. 
View post on Instagram
 

Video Credit Instagram @MadhurasRecipe

आणखी वाचा :

साध्या हळदीपेक्षा आंबे हळद आहे आरोग्यासाठी अधिक लाभदायक, जाणून घ्या 8 फायदे

Gajar Kheer Shots Recipe Video : गाजर खीर शॉर्ट्स रेसिपी

खमंग मटार कचोरी, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप रेसिपी