Mahashivratri 2025 च्या उपवासाला तयार करा मखानाचे हे 5 पदार्थ
Lifestyle Feb 24 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Pinterest
Marathi
मखान्याची रबडी
उपवासासाठी मखान्याची रबडी तयार करू शकता. यासाठी पॅनमध्ये दूध गरम करा. दुसऱ्या बाजूला मखाने तूपात भाजून वाटून घ्या. यामध्ये दूध, साखर मिक्स करुन घट्ट शिजवून घ्या.
Image credits: Pinterest
Marathi
मखान्याची खीर
मखान्याची खीर महाशिवरात्रीच्या उपवासावेळी तयार करू शकता. यासाठी कढईमध्ये तूप गरम करुन त्यामध्ये मखाने भाजून घ्या. यानंतर दूध घालून वेलची पावडर, साखर आणि केशर मिक्स करा.
Image credits: Pinterest
Marathi
मखान्याची फिरनी
मखान्याची फिरनी तयार करण्यासाठी कढईत तूप गरम करुन त्यामध्ये मखाना भाजून घ्या. यानंतर मखाना मिक्सरमध्ये बारीक वाटून त्यामध्ये दूध मिक्स करुन उकळवा. यावेळी ड्राय फ्रुट्सही वापरा.
Image credits: Pinterest
Marathi
मखानाचे लाडू
मखानाचे लाडू यंदाच्या महाशिवरात्रीला तयार करू शकता. उपवासासाठी हा बेस्ट पर्याय आहे.
Image credits: social media
Marathi
मखाना एनर्जी बार
मखानापासून चविष्ट एनर्जी बार महाशिवरात्रीच्या उपवासावेळी ट्राय करू शकता. यासाठी ड्राय फ्रुट्स, तूप आणि गुळाचा वापर करावा लागेल.