MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • सप्टेंबर 2024 मध्ये कधी असणार अखेरचे चंद्रग्रहण? जाणून घ्या तारखेसह सूतक वेळ

सप्टेंबर 2024 मध्ये कधी असणार अखेरचे चंद्रग्रहण? जाणून घ्या तारखेसह सूतक वेळ

वर्ष 2024 मधील अखेरचे चंद्रग्रहण 18 सप्टेंबरला असणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. पण ग्रहणाची वेळ आणि याचा प्रभाव पडणार का याबद्दल जाणून घेऊया... 

2 Min read
Author : Chanda Mandavkar
| Updated : Sep 05 2024, 07:56 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
चंद्रग्रहणासंबंधित प्रत्येक प्रश्नाची उत्तरे
Image Credit : our own

चंद्रग्रहणासंबंधित प्रत्येक प्रश्नाची उत्तरे

वर्ष 2024 मधील अखेरचे चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यात असणार आहे. या ग्रहणाबद्दल सर्वांना जाणून घेण्याची फार उत्सुकता आहे. अशातच काहीजण सातत्याने असे विचारत आहे की, ग्रहणाची वेळ काय असणार किंवा भारतात दिसणार का? याबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.

26
कधी असणार वर्षातील अखेरचे चंद्रग्रहण?
Image Credit : Getty

कधी असणार वर्षातील अखेरचे चंद्रग्रहण?

ज्योतिषशास्रानुसार, वर्ष 2024 मधील अखेरचे चंद्रग्रहण 18 सप्टेंबर, बुधवारी असणार आहे. हे एक उपच्छाया ग्रहण असणार आहे. या दिवशी भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला असणार आहे. याच्या दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. येत्या 18 सप्टेंबरचे चंद्रग्रहण काही प्रकारे महत्वाचे असणार आहे.

36
चंद्रग्रहणाची वेळ
Image Credit : Asianet News

चंद्रग्रहणाची वेळ

भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण 18 सप्टेंबरच्या सकाळी 06 वाजून 11 मिनिटांपासून ते रात्री 10 वाजून 17 मिनिटांपर्यंत असणार आहे. या ग्रहणाचा कालावधी 04 तास 06 मिनिट असणार आहे. वेगवेगळ्या देशात याच्या वेळेत फरक असणार आहे.

46
भारतात चंद्रग्रहण दिसणार का?
Image Credit : others

भारतात चंद्रग्रहण दिसणार का?

वैज्ञानिकांनुसार, 18 सप्टेंबरला असणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण आर्कटिक युरोप, उत्तर-दक्षिण अमेरिका, आफ्रिका, हिंद महासागर, अटलांटिक महासागर आणि अंटार्कटिका अशा काही ठिकाणी दिसणार आहे.

56
सूतक वेळ
Image Credit : Asianet News

सूतक वेळ

विद्वानांनुसार, चंद्रग्रहणावेळी सूतक काळ याच्या सुरु होण्याच्या 9 तास आधी सुरु होते. म्हणजेच ज्या देशात चंद्रग्रहण असणार आहे तेथे 9 तास आधी सूतक काळ सुरु होणार आहे. दरम्यान, भारतात चंद्रग्रहण दिसणार नाही. यामुळे सूतक काळही नसणार आहे.

66
उपच्छाया ग्रहण म्हणजे काय?
Image Credit : Asianet News

उपच्छाया ग्रहण म्हणजे काय?

खलोग विज्ञानात चंद्रग्रहणाचे काही प्रकार सांगण्यात आले आहेत. यापैकीच एक म्हणजे उपच्छाया ग्रहण आहे. या ग्रहणावेळी पृथ्वीच्या बाहेरच्या हिस्साची छाया चंद्रावर पडते. यामुळे चंद्राचा पृष्ठभाग हलका भुरकट दिसू लागतो. यालाच उपच्छाया चंद्रग्रहण असे म्हटले जाते.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा :

Ganesh Chaturthi 2024 : मध्यप्रदेशातील गणपती मंदिरात उलटा स्वस्तिक, वाचा कारण

यंदा जेष्ठागौरी आवाहन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्तासह पूजा विधी

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
Recommended Stories
Recommended image1
Fitness Tips: मिनी डॉक्टर आता तुमच्या मनगटावर! 2026 मधील टॉप 5 फिटनेस स्मार्टवॉच
Recommended image2
Menopause Diet: रजोनिवृत्तीच्या काळात महिलांनी 'हे' पदार्थ खाल्लेच पाहिजेत...
Recommended image3
Gold Hoop Earrings: फक्त 2 ग्रॅम सोन्यात बनवा हूप इअररिंग्स, या 7 डिझाइन्स सेव्ह करून ठेवा
Recommended image4
Teacher Look: टीचर लुकला द्या ग्लॅमरस टच, विद्या बालनच्या या 6 साड्या आहेत बेस्ट
Recommended image5
Gudhi Padwa 2026: हिंदू नववर्षाचा श्रीगणेशा! गुढीपाडवा का साजरा करतात? जाणून घ्या 'या' ५ खास गोष्टी आणि शुभ मुहूर्त
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved