घरात लग्नसमारंभ आहे आणि टेलरने ऐनवेळी ब्लाउज शिवून दिला नाही? काळजी करू नका. शिलाई मशीनशिवाय फक्त १०-२० मिनिटांत सुंदर ब्लाउज कसा बनवायचा हे जाणून घ्या. हा व्हायरल फॅशन हॅक तुमचं काम सोपं करेल.

Blouse Designs For Women: घरात लग्नाची धामधूम सुरू आहे आणि तुमचा टेलरवाला ऐनवेळी हात वर करतो, हा तर कायमचाच प्रॉब्लेम! अशावेळी काय घालायचं, हे टेन्शन येतं. पण आता काळजी करू नका. आम्ही तुमच्यासाठी एक भारी आयडिया आणली आहे. तुम्ही घरच्या घरी, टेलरशिवाय फक्त १०-१५ मिनिटांत ब्लाउज बनवू शकता. सध्या सोशल मीडियावर एक हॅक व्हायरल होत आहे, जिथे ब्राच्या मदतीने नवीन ब्लाउज डिझाइन तयार केलं आहे. जर तुम्हीही कधी अशा परिस्थितीत अडकला असाल, तर ही आयडिया नक्कीच तुमचं काम सोपं करेल.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

घरी ब्लाउज कसा बनवायचा?

ब्लाउज शिवायला शिकणं हे खूप वेळखाऊ काम आहे आणि ते प्रत्येकाला जमतंच असं नाही. अशा परिस्थितीत, ब्राच्या मदतीने ब्लाउज बनवणं सोपं आहे. यासाठी तुम्हाला स्ट्रॅपलेस ब्रा (ज्याला पट्ट्या नसतात), सुई-दोरा आणि कात्री लागेल.

View post on Instagram

ब्लाउज कसा शिवायचा?

ब्लाउज पीस घेऊन ब्रालेट कपच्या वर ड्रेपिंग स्टाईलमध्ये ठेवा आणि छोट्या-छोट्या प्लेट्स बनवून शिवून टाका. यामुळे DIY ब्लाउजला एक 'रश्ड' (Rushed) लुक येतो. जास्त घट्ट शिलाई करण्याऐवजी सुई-दोऱ्याने लांब-लांब टाके घाला. यामुळे ब्लाउज सुरक्षित राहतो आणि तुमचा वेळही वाचतो. यानंतर, दोन्ही कप्सच्या मधोमध कापड एकत्र करून एक सुंदर बो (Bow) तयार करा आणि तिथे एक टाका मारा. उरलेल्या कापडाचा वापर तुम्ही स्लीव्हज बनवण्यासाठी करू शकता.

मशीनशिवाय ब्लाउज बनवताना काय लक्षात ठेवाल?

  • झटपट ब्लाउज शिवताना फॅब्रिकची निवड महत्त्वाची आहे. जॉर्जेट, शिफॉन आणि सॅटिनमध्ये प्लेट्स सहज बनतात. तर कॉटन-सिल्कसारख्या कापडात प्लेट्स बनवायला वेळ लागतो आणि फिनिशिंगही चांगली येत नाही.
  • इन्स्टंट ब्लाउजसाठी डबल लेयर धागा वापरा, जेणेकरून तो मजबूत राहील.
  • साध्या ब्राऐवजी पॅडेड ब्रा वापरा. यामुळे चांगली फिटिंग येते आणि योग्य शेप व सपोर्ट मिळतो.
  • ब्लाउज खूपच साधा वाटत असेल, तर त्याला हेवी लुक देण्यासाठी तुम्ही स्टोन, जुनं ब्रोच किंवा कुंदन लावू शकता.