- Home
- lifestyle
- Janmashtami 2025 : जन्माष्टमीला या 3 राशींसाठी भाग्याचा काळ! जाणून घ्या कोणाचे नशीब उघडेल!
Janmashtami 2025 : जन्माष्टमीला या 3 राशींसाठी भाग्याचा काळ! जाणून घ्या कोणाचे नशीब उघडेल!
मुंबई - यावर्षी जन्माष्टमीला ४ ग्रह एकाच स्थानावर असतील, जे वृषभ, मिथुन आणि सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. या शुभ योगामुळे आर्थिक लाभ, यश आणि जीवनात सकारात्मक बदल येतील. जाणून घ्या कसे उघडेल नशीब.

घरोघरी श्रीकृष्णाची पूजा
आज शनिवारी जन्माष्टमी आहे. घरोघरी श्रीकृष्णाची पूजा केली जात आहे. हिंदू धर्मात जन्माष्टमी हा एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाते. याच दिवशी श्रीविष्णूचा आठवा अवतार कृष्ण यांचा जन्म झाला होता. देशभर प्रचंड उत्साह आणि उल्हासात कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते.
भगवान श्रीकृष्णाची कृपा
यंदाची जन्माष्टमी विशेष आहे. शास्त्रानुसार, जन्माष्टमीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण १६ ऑगस्ट रोजी ४ ग्रह एकाच स्थानावर असतील. त्यामुळे १२ राशींपैकी ३ राशींच्या जीवनातील चिंता कायमची दूर होईल. कारण या राशीच्या लोकांवर भगवान श्रीकृष्णाची कृपा असेल.
या तीन राशींच्या नशिबात बदल
१६ ऑगस्ट रोजी जन्माष्टमीच्या दिवशी बुध, गुरु, सूर्य आणि शनि एक दुर्मिळ योग तयार करत आहेत. जन्माष्टमीला बुध सूर्यासोबत असेल. शनि वक्री, गुरु, सूर्य आणि शनि एक दुर्मिळ योग तयार करत आहेत. या दिवशी बुध सूर्यासोबत असेल. यामुळे या तीन राशींच्या नशिबात बदल होईल.
वृषभ राशी-
ज्योतिषशास्त्रानुसार, जन्माष्टमीला तयार होणारे शुभ योग वृषभ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरतील. तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. तुम्ही उत्तम यश मिळवू शकता. विवाह ठरण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होईल.
मिथुन राशी-
मिथुन राशीचे नशीब उघडेल. गुरु आणि शुक्राचा योग मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल. कोणाबरोबर चांगल्या भागीदारीची जबाबदारी मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. पैसा कमविण्यावर लक्ष द्या. दिवस खूप फायदेशीर आहे. या काळात या काही राशींच्या नशिबात बदल येईल.
सिंह राशी
जन्माष्टमीचे शुभ योग सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ आणि लाभदायक आहेत. या काळात आर्थिक लाभाची शक्यता आहे. हा काळ कोणत्याही कामासाठी शुभ आहे. या काळात व्यवसायात नफा होईल. शास्त्राप्रमाणे आचरण करा. या काळात जीवनात चांगला काळ येईल. तुमच्या नशिबात बदल होईल. अनेक अडचणींपासून सुटका मिळेल.
