सार

Janmashtami 2024 : भगवान कृष्णाच्या जन्मोत्सवावेळी देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय बहुतांशजणांच्या घरी बाळगोपाळची पूजा केली जाते. अशातच जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त, पूजा विधीसह कृष्ण जन्माची पौराणिक कथा जाणून घेऊया.

Janmashtami 2024 Puja Vidhi : जन्माष्टमीचा उत्सव अत्यंत शुभ मानला जातो. भगवान श्रीकृष्णाला समर्पित असणाऱ्या जन्माष्टमीचा उत्सव 26 ऑगस्टला साजरा केला जात आहे. या दिवशी मनोभावे बाळकृष्णाची पूजा केली जाते. याशिवाय कृष्णाच्या बाल लीलांची कथा आणि भजनाचे आयोजन केले जाते. यामुळे आयुष्यात सुख-शांती येते असे मानले जाते. जाणून घेऊया यंदाच्या जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त, पूजा विधीसह श्रीकृष्णाच्या जन्माच्या पौराणिक कथेबद्दल सविस्तर…

जन्माष्टमी तिथि

  • अष्टमी तिथि आरंभ: 26 ऑगस्ट 3 वाजून 39 मिनटांपासून ते
  • अष्टमी तिथि प्रारंभ: 27 ऑगस्टच्या रात्री 2 वाजून 19 मिनटांपर्यंत
  • रोहिणी नक्षत्र आरंभ: 26 ऑगस्ट दुपारी 3 वाजून 55 मिनटांपासून ते
  • रोहिणी नक्षत्र प्रारंभ: 27 ऑगस्ट दुपारी 3 बजकर 38 मिनटांपर्यंत

पूजेचा शुभ आरंभ

  • पूजेची वेळ : 26 ऑगस्टच्या रात्री 12 वाजून 06 मिनिटांपासून ते 12 वाजून 51 मिनिटांपर्यंत
  • पूजेचा वेळ : 45 मिनिटे
  • पारायण वेळ : 27 ऑगस्ट दुपारी 03 वाजून 38 मिनिटांनी
  • चंद्रोदय वेळ : रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी

पूजा विधी

  • जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करुन स्वच्छ वस्र परिधान करा
  • देवाला नमस्कार करुन व्रताचा संकल्प करा
  • बाळकृष्णाची पूजा करा
  • बाळकृष्णाचा श्रृंगार करुन विधिवत पूजा करा
  • श्रीकृष्णाला दही, साखरेचा नैवेद्य अर्पण करा
  • बाळगोपाळाला झोपाळ्यात झुलवा
  • बाळकृष्णाची आरती करा

कृष्ण जन्माष्टमीची पौराणिक कथा 
पुराणांनुसार, द्वापर युगात कंसाचा अत्याचार दिवसागणिक वाढत चालला होता. त्यावेळी आकाशवाणी झाली की, कंसाच्या बहिणीच्या गर्भातून जन्म घेणारा आठवा बालक त्याच्या मृत्यूचे कारण ठरेल. यामुळे कंसामुळे आपल्या बहिणीला कारावासमध्ये बंद केले होते. ज्यावेळी भगवान कृष्णाचा जन्म झाला तेव्हा सर्वजण झोपले होते आणि तेव्हाच वडील वासुदेव यांनी कृष्णाला कंसापासून बचाव करत मुसळधार पावसातून नंद गौडं यांच्या घरी पोहोचले. तेव्हापासून श्रीकृष्णाला नंदलाल असे संबोधले जाते. याशिवाय यशोदेला बाळकृष्णाच्या आईच्या रुपात ओखळले जाते.

आणखी वाचा : 

Janmashtami 2024 : 100 रुपयांपेक्षा कमी खर्चात तयार करा कृष्णाचा मुकुट, VIDEO

Janmashtami 2024 निमित्त खास संदेश पाठवून साजरा करा कृष्ण जन्मोत्सव