Janmashtami 2024 : श्रीकृष्णाच्या पूजेसाठी अशी सजवा थाळी, पाहा Ideas
- FB
- TW
- Linkdin
श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दही हंडी
जन्माष्टमीच्या उत्सवाची भारतात धूम असते. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 26 ऑगस्टला सकाळी 3 वाजून 40 मिनिटांनी सुरु होणार असून 27 ऑगस्टला रात्री 2 वाजून 19 मिनिटांनी संपणार आहे. येत्या 26 ऑगस्टला जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. याच्या दुसऱ्या दिवशी 27 ऑगस्टला दही हंडीचा उत्सव आहे. जन्माष्टमीच्या दिवशी घरासह श्रीकृष्णाच्या झोपाळ्याची देखील सजावट केली जाते. पूजेची थाळी देखील सजवली जाते. पूजेच्या थाळीमध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तूंशिवाय कृष्णाची पूजा अपूर्ण राहते असे मानले जाते. अशातच यंदाच्या जन्माष्टमीवेळी घरच्याघरीच आणि कमी वेळात कृष्णाच्या पूजेची थाळी कशी सजवायची याच्या काही आयडियाज पाहणार आहोत.
थाळीला रंग द्या
पूजेच्या थाळीला आपल्या हाताने रंगकाम करू शकता. यावर फ्लोरल अथवा स्पायरल डिझाइन करू शकता. थाळीला रंग देण्यासाठी ऑइल पेंट रंग अथवा फॅब्रिक रंगाचा वापर करा. रंग सुकल्यानंतर त्यावर स्टोनची डिझाइन किंवा हाताने पेटिंग करू शकता. लाल किंवा गुलाबी रंग पूजेच्या थाळीला देऊ शकता. पूजेसाठी हे रंग शुभ मानले जातात.
मोत्यांनी सजवा थाळी
जन्माष्टमीच्या दिवशी सुंदर थाळी सजवायची असल्यास मार्केटमधून वेगवेगळ्या प्रकारचे कुंदन आणि मोती खरेदी करा. याच्या मदतीने थाळी सजवता येईल. थाळीला सर्वप्रथम रंग दिल्यानंतर त्यावर मोत्यांची डिझाइन करा.
फुलांनी सजवा थाळी
पूजेत फुलांचे महत्व अधिक असण्यासह देवाला प्रिय असतात. तुम्ही पूजेची थाळी ताज्या फुलांनी किंवा आर्टिफिशियल फुलांनी सजवू शकता. ताज्या फुलांनी थाळी सजवण्यासाठी फुलांच्या पाकळ्या वापरु शकता.
रंगीत तांदूळचा वापर करुन सजवा थाळी
कोणत्याही पूजेसाठी तांदूळचा वापर करणे शुभ मानले जाते. पूजेची थाळी रंगीत तांदूळचा वापर करून सजवू शकता. थाळीवर आधी कागद अथवा कापड ठेवून त्यावर रंगीत तांदूळने सजवा.
आणखी वाचा :
Janmashtami 2024 : कृष्णाला प्रिय असणारा 'दही काला', वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी
Krishna Janmashtami 2024 वेळी घरी आणा या 7 वस्तू, होईल धनाची भरभराट