सार
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याशिवाय श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त काही कार्यक्रमांचे आयोजन, भजन, किर्तन असते. यंदाच्या कृष्ण जन्माष्टमीनिमित्त काही वस्तू घरी आणल्यास तुम्हाला कधीच पैशांची कमतरता जाणवणार नाही.
Krishna Janmashtami 2024 : श्रीकृष्ण जन्माष्टमीची वाट सर्व कृष्ण भक्तांकडून केली जाते. जन्माष्टमीच्या दिवशी उपवास ठेवून रात्री 12 वाजता बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यावेळी श्रीकृष्णाला वेगवेगळी फळ, दही-पोहे, सुंठ असे काही पदार्थ अर्पण केले जातात. यानंतर प्रसाद भक्तांमध्ये वाटला जातो. जन्माष्टमीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी येत्या 26 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. अशातच यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीवेळी पुढील काही 7 वस्तू घरी आणल्यानंतर नक्कीच तुम्हाला धनाची कमतरता जाणवणार नाही.
शंख घरी आणा
हिंदू धर्मात शंखला अत्यंत शुभ आणि पवित्र मानले आहे. मंदिरात शंख वाजवण्याची परंपरा आहे. यामुळे सकारात्मक उर्जा निर्माण होत नकारात्मक उर्जा दूर होते. घरात शंखनाद केल्याने सुख-शांती येते. यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शंख घरी आणू शकता.
तुळशीचे रोप
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. तुळशीचे रोप देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते. घरात तुळशीचे रोप ठेवल्याने धन-धान्याची नेहमीच भरभराट राहते. याशिवाय नकारात्मक उर्जा दूर होतात. खरंतर, दररोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याची प्रथा आहे. पण जन्माष्टमीवेळी घरी तुळशीचे रोप नसल्यास नक्की घेऊन या.
बासरी
भगवान श्रीकृष्णाला बासरी अत्यंत प्रिय आहे. श्रीकृष्णाचा श्रृंगार करताना बासरी देखील सजवली जाते. घरात बासरी असणे शुभ मानले जाते. यामुळे घरात शांतता कायम राहते. जन्माष्टमीच्या दिवशी घरात तुम्ही बासरी आणल्यास तुमची अडलेली कामे पूर्ण होतील.
मोराचे पंख
श्रीकृष्णाच्या श्रृंगारवेळी मोरपंखाची देखील सजावट केली जाते. खासकरुन कृष्णाच्या डोक्यावर मोराचा पंखही नेहमीच लावलेला दिसतो. घरात मोराचे पंख असल्यास सुख-समृद्धी येते. याशिवाय श्रीकृष्णाला मोरपंख अत्यंत प्रिय आहे. यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीवेळी मोराचा पंख नक्की घरी आणा.
गाय आणि वासरूची मुर्ती
श्रीकृष्णाला गाय आणि वासरू अत्यंत प्रिय आहे. असे म्हटले जाते की, श्रीकृष्ण यदुवंशी असल्याने ते गायीचे पालन करुन त्यांची सेवा करायचे. घरात गाय आणि वासरूची मुर्ती ठेवल्यास सुख-समृद्धी वाढेल.
खडीसाखर आणि दही
खडीसाखर आणि दही भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे. जन्माष्टमीच्या दिवशी खडीसाखर आणि दह्याचा नैवेद्य श्रीकृष्णाला दाखवू शकता. असे केल्याने घरात आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही.
बाळकृष्णाची मुर्ती
जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची मुर्ती घरी आणू शकता. यानंतर बाळकृष्णाची पूजा केल्याने घरात सुख-शांती नेहमीच टिकून राहिल. जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा करतेवेळी झोपाळा देखील सजवला जातो. यानंतर बाळकृष्णाला त्यावर ठेवून पूजा केली जाते.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
भारतातील या मंदिरात मृत व्यक्तींच्या आत्म्याला मिळते मुक्ती
Ganesh Chaturthi 2024 : अष्टविनायकाच्या 8 गणपतींच्या मंदिरांची वाचा अख्यायिका