सार

गणपती उत्सव साजरा करताना त्याचा खरा उद्देश लोकांना विसरला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तामिळनाडूमधील एका गणपती मिरवणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये डीजे किंवा कोणताही गोंधळ न करता भक्तीभावाने मिरवणूक काढण्यात आली आहे.

महाराष्ट्रात गणपती उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोकणातील गणपती साजरा करण्यासाठी तर तेथील लोक जगभरातून घरी येतात आणि गणपती व गौरी सणाचा आनंद घेतात. लोकमान्य टिळकांनी गणपती सुरु केला त्यावेळी लोकांनी एकत्र यावं आणि सण साजरे करावेत हा त्यामागचा प्रमुख उद्देश होता पण आता तो उद्देश पूर्णपणे बदलून गेला आहे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे गणपती उत्सवाच्या काळात आता डीजे आणि इतर गोष्टींमुळे या उत्सवाचा प्रमुख उद्देश हा मागे पडत चालल्याचं दिसून येत आहे. 

तामिळनाडूतील गणपतीची मिरवणूक आली चर्चेत - 
तामिळनाडू राज्यातील गणपती मिरवणूक चर्चेत आली आहे. डीजे न वाजवता, कोणताही धिंगाणा न घालता सण साजरे होऊ शकतात हेच या व्हिडिओतून दिसून येत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये इतका मोठा गणपती,अख्या महाराष्ट्रात नाही. कुठलीही फालतुगिरी नाही, DJ नाही, अचकट विचकट गाणी व ङान्स नाही !!! अत्यंत भक्तीभावाने परिपुर्ण अशी मिरवणूक बोध घ्यावा अशी. मिरवणूक तामीळनाङू येथील आहे, असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.