थंडीच्या दिवसात खा या 3 प्रकारचे मुरांबे, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती

| Published : Nov 22 2024, 08:42 AM IST

Muramba
थंडीच्या दिवसात खा या 3 प्रकारचे मुरांबे, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

थंडीच्या दिवसात आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेणे महत्वाचे असते. या ऋतूत हंगामी आजार, सर्दी-खोकलासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशातच तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डाएटमध्ये आवळ्याचे सेवन करू शकता.

Immunity Booster Murabba : थंडीच्या दिवसात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करण्याचे मन करते. याशिवाय थंडीतील वातावरण जेवढे आल्हादायक वाटते तेवढेच आरोग्यासंबंधित आजार घेऊन येणारे असते. या काळात ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते त्यांना लगेच सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू होते. थंडीच्या दिवसात उष्ण आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. अशातच थंडीत डाएटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुरांब्यांचा समावेश करू शकता. जेणेकरुन रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासह आरोग्य हेल्दी राहण्यास मदत होईल. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...

गाजराचा मुरांबा


थंडीत मार्केटमध्ये गाजर खूप येतात. गाजरांमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटिनसह काही पोषण तत्त्वे असतात. याचे सेवन केल्याने आरोग्याला काही प्रकारे फायदे होतात. पण थंडीत गाजराच्या मुरांब्याचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य राखण्यासह रोगप्रतिकारक शक्तीही बूस्ट होते.

आल्याचा मुरांबा


आल्याचे सेवन केल्याने शरीर आतमधून गरम राहण्यास मदत होते. आल्याचा वेगवेगळ्या पदार्थात किंवा चहामध्ये वापर करू शकता. याशिवाय आल्याचा पाक किंवा मुरांबा तयार करुन थंडीत खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाईल. जेणेकरुन हंगामी आजारांशी लढण्यास मदत होईल.

आवळ्याचा मुरांबा


आवळ्याला थंडीतील सुपरफुड मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. याशिवाय आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स असल्याने तुम्ही आजारांपासून दूर राहता. थंडीच्या दिवसात सकाळी नाश्तासोबत आवळ्याचा थोडा मुरांबा खाल्ल्यानेही आरोग्याला फायदा होऊ शकतो.

दरम्यान, कोणत्याही मुरांब्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. कारण मुरांब्यामध्ये साखरेचा वापर केलेला असतो. अत्याधिक प्रमाणात मुरांब्यांचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढू शकते. याशिवाय खाल्ल्यानंतर लगेच पाणी देखील पिऊ नका.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

थंडीच्या दिवसात खा मूळा, लठ्ठपणासह या 5 समस्या होतील दूर

शरिराला आतमधून गरम ठेवतील हे 3 मसाले, असा करा पदार्थांमध्ये वापर