- Home
- lifestyle
- Brain Health : झोपण्यापूर्वी मोबाईल बघता? मेंदूचं आरोग्य धोक्यात येईल; वेळीच सावध व्हा
Brain Health : झोपण्यापूर्वी मोबाईल बघता? मेंदूचं आरोग्य धोक्यात येईल; वेळीच सावध व्हा
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरल्याने तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगतात. यामुळे कोणते धोके निर्माण होतात आणि त्याची लक्षणं काय आहेत, हे जाणून घेऊया.
14

Image Credit : chatgpt
जास्त वेळ झोपून उपयोग नाही
रात्री उशिरा झोपून सकाळी जास्त वेळ झोपल्याने काही फायदा होत नाही. यामुळे मेंदूचं झालेलं नुकसान भरून निघत नाही. कारण गाढ झोपेतच आपला मेंदू नवी माहिती संग्रहित करतो, आठवणी ताज्या करतो आणि पेशींची दुरुस्ती करतो.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

24
Image Credit : Getty
स्क्रोलिंगमुळे झोप का उडते?
मेसेज पाठवणं आणि व्हिडिओ पाहण्याने मेंदू सतत उत्तेजित राहतो. फोनमधून निघणारा 'ब्लू लाईट' मेलाटोनिन नावाच्या झोपेसाठी आवश्यक हार्मोनची निर्मिती थांबवतो. यामुळे आपलं नैसर्गिक 'बॉडी क्लॉक' बिघडतं. म्हणूनच, आठ तास झोपूनही सकाळी थकवा जाणवतो.
34
Image Credit : Getty
अपूर्ण झोपेचे मेंदूवर होणारे परिणाम
झोपेच्या कमतरतेमुळे स्मरणशक्ती आणि आकलन क्षमतेवर परिणाम होतो. निर्णय घेण्यास अडचण येते. राग, चिंता आणि मानसिक ताण वाढतो. विचारांमध्ये स्पष्टता नसलेली 'ब्रेन फॉग' नावाची अवस्थाही येऊ शकते. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, त्यांची डोकेदुखी यामुळे वाढू शकते.
44
Image Credit : Gemini
ही लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा
खूप थकवा येऊनही झोप न लागणं, रात्री अनेक वेळा जाग येणं, सकाळी ताजेतवानं न वाटणं, डोकेदुखी, लक्ष केंद्रित न करता येणं, विसरभोळेपणा, अचानक राग किंवा चिंता वाटणं आणि दिवसा जास्त झोप येणं, ही सर्व लक्षणं तुमचा मोबाईल वापर झोप बिघडवत असल्याचं दर्शवतात.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

