MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Wash Sneakers In Washing Machine : वॉशिंग मशीनमध्ये शूज धुताय? नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या ४ सोप्या टिप्स

Wash Sneakers In Washing Machine : वॉशिंग मशीनमध्ये शूज धुताय? नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या ४ सोप्या टिप्स

वॉशिंग मशीनमध्ये स्नीकर्स धुतल्याने ते अगदी नव्यासारखे चमकतात, पण एका छोट्या चुकीमुळे शूज खराबही होऊ शकतात. त्यामुळे शूज धुण्यापूर्वी लेस काढा, धूळ झटकून घ्या आणि थंड पाण्यात धुवून हवेत वाळवा.

3 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Oct 05 2026, 08:38 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
वॉशिंग मशीनमध्ये स्नीकर्स धुण्याची योग्य पद्धत
Image Credit : Gemini | AI Generated

वॉशिंग मशीनमध्ये स्नीकर्स धुण्याची योग्य पद्धत

Wash Sneakers In Washing Machine: स्नीकर्स खूप लवकर घाण होतात. तुम्ही रोज एकच शूज घालत असाल, तर त्यावर धूळ, चिखल आणि डाग साचायला लागतात. ओल्या कापडाने पुसल्यास वरची धूळ निघते, पण खूप घाण झालेले शूज डीप क्लीन करणे गरजेचे असते.

पण तुमचे आवडते शूज वॉशिंग मशीनमध्ये टाकण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. सर्वच प्रकारचे शूज मशीनमध्ये धुता येत नाहीत. चुकीच्या तापमानात किंवा चुकीच्या पद्धतीने शूज धुतल्यास त्याचे मटेरियल, आकार किंवा गम खराब होऊ शकतो.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
पायरी १: तुमचे स्नीकर्स मशीनमध्ये धुण्यायोग्य आहेत का ते तपासा
Image Credit : chat GPT

पायरी १: तुमचे स्नीकर्स मशीनमध्ये धुण्यायोग्य आहेत का ते तपासा

तुमच्या स्नीकर्सवर जर मशीनमध्ये धुता येतील असे लिहिले असेल, तर या सोप्या पद्धतीने तुम्ही शूज सुरक्षितपणे स्वच्छ करू शकता. शूजसोबत दिलेली केअर इन्स्ट्रक्शन किंवा माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या. ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे.

काही कॅनव्हास आणि सिंथेटिक स्नीकर्स जेंटल सायकलवर धुता येतात. पण सुएड, लेदर किंवा इतर सेन्सिटिव्ह मटेरियलचे शूज सहसा वेगळ्या पद्धतीने स्वच्छ करावे लागतात.

केअर लेबलवर जर मशीनमध्ये धुण्यास मनाई केली असेल, तर शूज कितीही मजबूत दिसत असले तरी ते मशीनमध्ये टाकू नका.

Related Articles

Related image1
Gold Jewellery Cleaning : टूथपेस्ट आणि बेकिंग सोड्याने सोन्याचे दागिने साफ करताय? ही आहे योग्य पद्धत
Related image2
Floor Cleaning Hack : फरशी पुसूनही घाण राहतेय? जुन्या मोज्याचा हा भन्नाट जुगाड नक्की ट्राय करा
37
पायरी २: धुण्यापूर्वी स्नीकर्स तयार करून घ्या
Image Credit : AI Image

पायरी २: धुण्यापूर्वी स्नीकर्स तयार करून घ्या

शूज आधीच तयार करून ठेवल्यास ते स्वच्छ करण्याची प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सोपी होते.

सर्वात आधी शूजची लेस आणि इनसोल (जर काढता येत असेल तर) काढून घ्या. त्यानंतर शूज बाहेर नेऊन चांगले झटकून घ्या किंवा ब्रशने धूळ, वाळू आणि चिखल साफ करा. वरची घाण आधीच साफ केल्याने ती मशीनच्या इतर भागात पसरत नाही.

तुम्ही शूजची लेस वेगळी धुवू शकता. तसेच काढता येणारे बहुतांश इनसोल सूचनेनुसार पुसून घेता येतात. शूज खूप घाण असतील तर मशीनमध्ये टाकण्यापूर्वी मऊ ब्रशने घासून घ्या.

47
पायरी ३: जेंटल वॉश सेटिंग निवडा
Image Credit : Getty

पायरी ३: जेंटल वॉश सेटिंग निवडा

शूज तयार झाल्यावर ते वॉशिंग मशीनमध्ये टाका. गरम पाणी किंवा हार्श सेटिंग अजिबात वापरू नका. त्याऐवजी थंड पाण्यात जेंटल किंवा डेलिकेट सायकल निवडा. कडक डिटर्जंटऐवजी माईल्ड किंवा हलके क्लिन्झर वापरणे नेहमीच चांगले असते.

मशीनमध्ये एकाच वेळी खूप कपडे किंवा वस्तू टाकू नका. शूज कंपनीने दिलेल्या सूचनांचे नेहमी पालन करा. शूजसोबत काही मऊ टॉवेल टाकल्यास मशीनच्या ड्रममध्ये शूज आदळण्याचा धोका थोडा कमी होतो.

कोणत्याही प्रकारची उष्णता किंवा जास्त घासघीस न करता स्नीकर्स स्वच्छ करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.

57
पायरी ४: स्नीकर्स मोकळ्या हवेत वाळवा
Image Credit : Getty

पायरी ४: स्नीकर्स मोकळ्या हवेत वाळवा

शूज धुण्याइतकेच ते वाळवणेही महत्त्वाचे आहे. शूज कंपनीने जर ड्रायरमध्ये वाळवण्याची परवानगी दिली नसेल, तर स्नीकर्स ड्रायरमध्ये टाकू नका. जास्त उष्णतेमुळे शूजचा आकार आणि गम किंवा सीलंटसारखे मटेरियल खराब होऊ शकते.

त्याऐवजी शूज रूम टेम्परेचरवर मोकळ्या हवेत वाळवा. शूजच्या आत स्वच्छ पेपर टॉवेल हलकेच कोंबून ठेवा. यामुळे शूज लवकर पाणी शोषून घेतील आणि वाळताना त्यांचा आकारही बिघडणार नाही.

शूज थेट उष्णतेपासून दूर ठेवा आणि पुन्हा घालण्यापूर्वी ते पूर्णपणे वाळू द्या.

67
लक्षात ठेवण्यासारख्या इतर महत्त्वाच्या गोष्टी
Image Credit : Getty

लक्षात ठेवण्यासारख्या इतर महत्त्वाच्या गोष्टी

मशीनमध्ये शूज धुणे सोयीचे असले तरी सर्वच शूज मशीनमध्ये टाकता येत नाहीत. महागडे, सेन्सिटिव्ह किंवा स्पेशल शूज हाताने किंवा कंपनीच्या सूचनेनुसार स्वच्छ करणे सर्वात उत्तम ठरते.

तुम्हाला काय करावे हे समजत नसेल, तर मऊ ब्रश, हलका साबण आणि थोडे पाणी वापरून हाताने शूज स्वच्छ करणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.

यासोबतच, खूप कडक क्लिनिंग सायकल आणि जास्त गरम पाणी वापरणे टाळा. याचा शूजच्या मटेरियल आणि आकारावर वाईट परिणाम होऊ शकतो.

77
वॉशिंग मशीनमध्ये स्नीकर्स स्वच्छ करणे खूप सोपे जाते
Image Credit : Asianet News

वॉशिंग मशीनमध्ये स्नीकर्स स्वच्छ करणे खूप सोपे जाते

वॉशिंग मशीनमध्ये सामान्य स्नीकर्स स्वच्छ करणे खूप सोपे जाते, पण शूज मशीनमध्ये धुण्यायोग्य असतील तरच हे शक्य आहे. सर्वात आधी केअर इन्स्ट्रक्शन तपासा, शूजची धूळ किंवा काढता येणारे भाग वेगळे करा, थंड पाण्यात जेंटल सायकल वापरा आणि मोकळ्या हवेत वाळवा.

योग्य नियम पाळल्यास तुमचे जुने स्नीकर्सही अगदी नव्यासारखे चमकतील आणि तुम्हाला वारंवार नवीन शूज विकत घेण्याची गरज पडणार नाही.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Navratri 2026 Fasting Snacks : नवरात्रीत उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलात? घरीच बनवा हे ७ झटपट स्नॅक्स
Recommended image2
Jowar Roti : ज्वारीची भाकरी खाल्ल्याने खरंच वजन कमी होतं का? कोणी खाऊ नये?
Recommended image3
Amavasya Beliefs : अमावस्येला या 7 वस्तू खरेदी करू नयेत का? जाणून घ्या सत्य
Recommended image4
Bangles Set : हातांचे सौंदर्य वाढवणाऱ्या बांगड्या आणि मॅचिंग ज्वेलरी सेट
Recommended image5
Blouse Designs: सिल्क साडीचे सौंदर्य दुप्पट करणारे भन्नाट ब्लाऊज डिझाईन्स
Related Stories
Recommended image1
Gold Jewellery Cleaning : टूथपेस्ट आणि बेकिंग सोड्याने सोन्याचे दागिने साफ करताय? ही आहे योग्य पद्धत
Recommended image2
Floor Cleaning Hack : फरशी पुसूनही घाण राहतेय? जुन्या मोज्याचा हा भन्नाट जुगाड नक्की ट्राय करा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved