उन्हाळ्यात कैरीचं लोणचं घरी कस बनवाव?
उन्हाळ्यात घरी कैरीचं लोणचं बनवण्यासाठी साहित्य, मसाला तयार करण्याची पद्धत आणि साठवणुकीच्या टिप्स येथे आहेत. हे लोणचं चवीला अप्रतिम आणि बनवायला सोपे आहे.
- FB
- TW
- Linkdin
)
उन्हाळ्यात कैरीचं लोणचं घरी कस बनवाव?
कैरीचं लोणचं म्हणजे अगदी पारंपरिक, चविष्ट आणि प्रत्येक मराठी घरातील खास डिश! खाली दिली आहे पारंपरिक कैरीच्या लोणच्याची रेसिपी
साहित्य
कच्ची कैरी – १ किलो (साफ, सुकवलेली व मध्यम तुकड्यांमध्ये चिरलेली), मेथी दाणे – ४ टेबलस्पून, मोहरी दाणे – ५ टेबलस्पून, हळद – २ टेबलस्पून, हिंग – १/२ टीस्पून, तिखट (लाल तिखट/बेडगी मिक्स) – १०० ग्रॅम (स्वतःच्या चवीनुसार कमी-जास्त), मीठ – १५० ग्रॅम, तेल – ५०० मि.ली. (तिळाचं तेल उत्तम)
कैरीची तयारी
कैरी स्वच्छ धुऊन पूर्ण कोरडी करा. मध्यम आकाराचे तुकडे करा.
लोणच्याचा मसाला तयार करा
मेथी आणि मोहरी थोडं भाजून थंड झाल्यावर बारीक पूड करा. त्यात हळद, हिंग, मीठ, तिखट मिसळा. चिरलेली कैरी एका मोठ्या बाउलमध्ये घ्या. त्यात तयार मसाला टाका आणि चांगलं मिसळा.
तेल गरम करा
तिळाचं तेल गरम करा. थोडंसं थंड झालं की ते लोणच्यावर ओता. सर्व नीट एकत्र करा.
साठवणूक
लोणचं पूर्ण थंड झाल्यावर कोरड्या बरणीत/काचेच्या बाटलीत भरून ठेवा. ५-७ दिवस रोज हलकं हलवा जेणेकरून मसाला नीट मुरतो.