या 3 वस्तूंपासून घरच्याघरीच तयार करा Toilet Cleaner, चमकेल वॉशरुम

| Published : Nov 18 2024, 09:03 AM IST

Homemade toilet cleaner

सार

Homemade toilet cleaner : मार्केटमधून केमिकलयुक्त टॉयलेट क्लीनर खरेदी करण्याएवजी घरच्याघरी देखील तयार करू शकता. यासाठी कोणत्या वस्तूंचा वापर करावा लागतो याबद्दल जाणून घेऊया...

Homemade toilet cleaner : वॉशरुम स्वच्छ करण्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे टॉयलेट क्लीनर मिळतात. पण अचानक टॉयलेट क्लीनर संपल्यानंतर वॉशरुम स्वच्छ करायचे असल्यास तुम्ही घरच्याघरी देखील टॉयलेट क्लीनर तयार करू शकता. यासाठी बेकिंग सोडा बेस्ट पर्याय आहे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...

बेकिंग सोड्यासोबत वापरा या वस्तू
घरच्याघरी टॉयलेट क्लीनर तयार करण्यासाठी बेकिंग सोडा, लिंबाचा रस आणि डिशवॉश लिक्विडचा वापर करावा लागेल. सर्व वस्तू व्यवस्थितीत एकत्रित केल्यानंतर तुमचे घरच्याघरीच टॉयलेट क्लीनर तयार होईल. टॉयलेट क्लीनर तयार करताना लक्षात ठेवा की, दोन चमचे बेकिंग सोडा, एक चमचा डिशवॉश लिक्विड आणि एक चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे. यामध्ये एसेंशियल ऑइलही मिक्स करू शकता. या टॉयलेट क्लीनरचा वापर करूनही वॉशरुम स्वच्छ करू शकता.

व्हाइट व्हिनेगरचा वापर
व्हाइट व्हिनेगरच्या मदतीने देखील वॉशरुम स्वच्छ होते. यासाठी दोन कप व्हाइट व्हिनेगर आणि एक कप बेकिंग सोडा मिक्स करून टॉयलेट क्लीनर तयार करा. वॉशरुममध्ये क्लीनर सर्व ठिकाणी पसरवून पाण्याने स्वच्छ धुवा.

बेकिंग सोड्याव्यतिरिक्त या गोष्टींचाही करू शकता वापर
टॉयलेट स्वच्छ ठेवण्यासाठी घरातील काही सामानाचा वापर करू शकता. यावेळी ग्लिसरीनच आणि व्हिनेगरचा वापर करून टॉयलेट क्लीनर तयार करू शकता. यामुळे वॉशरुमची चमक पुन्हा येईल. यासाठी एक कप ग्लिसरीनमध्ये व्हाइट व्हिनेगर आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करा. हे क्लीनर एका स्प्रे बॉटलमध्ये भरुन टॉयलेट स्वच्छ करा.

बोरेक्स पावडरचा वापर
टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी बोरेक्स आणि लिंबाचा रसाचा वापर करू शकता. यापासून तयार केलेले क्लीनर वॉशरुममध्ये स्प्रे करून थोडावेळ ठेवा. यानंतर स्वच्छ पाण्याने वॉशरुम धुवा. याशिवाय सिट्रिक अ‍ॅसिड, बेकिंग सोडा, टी ट्री ऑइल आणि पाणी मिक्स करून टॉयलेट क्लीनर घरच्याघरी तयार करू शकता. यामुळे टॉयलेटमधील बॅक्टेरिया दूर होण्यासह स्वच्छताही राखली जाईल.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

थंडीतील डाएटमध्ये या 5 फूड्सचा करा समावेश, शरीर राहिल आतमधून गरम

नीता अंबानी यांच्या पॉपकॉर्न बॅगची किंमत २४ लाख रुपये!