सार
आल्याचा वापर भाजी ते चहा अशा वेगवेगळ्या पदार्थांसाठी केला जातो. पण तुम्हाला माहितेय का, मार्केटमध्ये सध्या बनावट आल्याची विक्री केली जात आहे. अशातच फसवणूकीपासून दूर राहण्यासाठी आलं खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेऊया...
how to Identify real and fake ginger : आल्याची चहा किंवा भाजीसाठी आल्याचा वापर केला जातो. याशिवाय थंडीत आल्याची चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आल्यामुळे शरीर आतमधून थंडीत उष्ण राहण्यास मदत करते. पण तुम्हाला माहितेय का, मार्केटमध्ये सध्या बनावट आल्याची देखील विक्री केली जात आहे. यामुळे आलं खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया...
आल्याची साल तपासून पाहा
आलं खरेदी करताना त्याची साल तपासून पाहा. आल्याची साल काढताना ती हाताला चिकटल्यास किंवा त्याचा वास आल्यास ते बनावट आलं नाही. उलट बनावट आल्याची साल कठोर असून त्याचा कोणताही वास येत नाही.
आल्याचा आकार
आल्याचा आकार पाहून देखील ते बनावट आहे की खरं हे कळू शकते. यासाठी मार्केटमधून कधीच स्वच्छ आणि चमकदार आलं खरेदी करू नका.
सुंगध तपासून पाहा
आल्याचा तिखट वास असतो. यामुळे आलं खरेदी करताना त्याचा लहान तुकडा उचलून त्याचा वास घेऊन पाहा. आल्याचा तिखट वास येत असल्यास ते बनावट नाही हे कळले जाईल. याशिवाट बनावट आल्याला कोणताही वास येत नाही.
पाण्यात बुडवून पाहा
बनावट आल्यापासून दूर राहण्यासाठी सोपी ट्रिक म्हणजे ते पाण्यात बुडवून ठेवा. बनावट आलं पाण्यात बुडवल्यानंतर वरती तरंगले जाईल.
आणखी वाचा :
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे ते झोपेसाठी सोपा उपाय, खा अश्वगंधा आणि मध
वाढलेलं वजन कमी करायचंय?, जाणून घ्या मेथी दाणे खाण्याचे 5 फायदे!