मधाचे काही गोष्टींसोबत सेवन करणे फायदेशीर ठरते. अशातच अश्वगंधासोबत मधाचे सेवन केल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात याबद्दल पुढे जाणून घेऊया...
अश्वगंधामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फोरस आणि झिंक अशी पोषण तत्त्वे असतात.
अश्वगंधामध्ये व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. अशातच मधात अश्वगंधा मिक्स करुन सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते.
मध आणि अश्वगंधाचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य राखले जाते.
शरिराला सूज येण्याची समस्या येत असल्यास डाएटमझ्ये मध आणि अश्वगंधाचे सेवन करावे.
रात्री लवकर झोप येत नसल्यास मध आणि अश्वगंधाचे सेवन करा.
एक चमचा मधात अर्धा चमचा अश्वगंधा मिक्स करा. यानंतर कोमट पाणी प्या.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.