सार

स्मार्ट क्लीनिंग पद्धती वापरून वेळेची बचत करा आणि घर स्वच्छ ठेवा. 5-10-15 मिनिटांचा नियम वापरून टेबल, खिडक्या, भांडी आणि इतर गोष्टी सहज स्वच्छ करा. दररोज थोडी स्वच्छता केल्यास मोठ्या क्लीनिंगची गरज भासणार नाही.

सुट्टीच्या दिवशी आराम करायचा, की घराची साफसफाई करायची, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. मात्र, हल्ली स्मार्ट क्लीनिंग पद्धती वापरून लोक वेळेची बचत करून घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवत आहेत.

गेल्या काही महिन्यांत, सोशल मीडियावर "क्विक क्लीनिंग चॅलेंज" आणि "१५ मिनिटात घर टापटीप" यांसारखे ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. यात लोक झोन-वाईज साफसफाई, डी-क्लटरिंग आणि मिनिमलिस्टिक सेटअप वापरून घर अधिक स्वच्छ ठेवत आहेत. स्वच्छतेसाठी नवा फॉर्म्युला – "5-10-15" नियम! 

तज्ज्ञांनी सुचवलेला 5-10-15 मिनिटांचा नियम लोक मोठ्या प्रमाणात वापरत आहेत: 

5 मिनिटे – 

टेबल, खिडक्या आणि फर्निचर स्वच्छ करणे 

10 मिनिटे – 

झाडू-पोछा आणि भांडी स्वच्छ करणे 

15 मिनिटे – 

अनावश्यक वस्तू बाजूला काढणे व सामान नीट लावणे 

तज्ज्ञांचा सल्ला:

  • दररोज थोडीथोडी स्वच्छता केल्यास मोठ्या क्लीनिंगची गरज भासणार नाही.
  • घरातील प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी घेतल्यास काम सोपे होते. 
  • संध्याकाळी १५ मिनिटे स्वच्छतेसाठी दिल्यास घर कायम नीटनेटके राहते.

स्वच्छ आणि टापटीप घर केवळ आरोग्यासाठी चांगले नाही, तर मानसिक तणावही कमी करते, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी थोड्या स्मार्ट ट्रिक्स वापरून तुम्हीही घर स्वच्छ ठेवू शकता!