- Home
- lifestyle
- Dopamine Rush : तुम्हाला सतत रील्स पाहण्याची सवय आहे का? तुमच्या मेंदूवर असा होतो परिणाम
Dopamine Rush : तुम्हाला सतत रील्स पाहण्याची सवय आहे का? तुमच्या मेंदूवर असा होतो परिणाम
तुम्ही सतत इंस्टाग्राम रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ पाहता का? यामुळे तुमच्या मेंदूमध्ये काय बदल होतात, डोपामिन कसं वाढतं, 'ब्रेन फॉग' म्हणजे काय आणि तुमची एकाग्रता का कमी होतेय, याबद्दलची सविस्तर माहिती.
16

Image Credit : Pixabay
स्मार्टफोन बनलाय आयुष्याचा अविभाज्य भाग
आजच्या डिजिटल जगात स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यातही इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स आणि टिकटॉकसारखे छोटे व्हिडिओ (Short-form videos) आपला बराचसा वेळ घेतात. क्षणोक्षणी स्क्रीन वरच्यावर ढकलणं हे साधं मनोरंजन वाटत असलं, तरी ते आपल्या मेंदूच्या रचनेवर आणि भावनिक कार्यांवर गंभीर नकारात्मक परिणाम करतं.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

26
Image Credit : Getty
सातत्याने रील्स पाहिल्याने काय होते?
सतत रील्स पाहिल्यावर मेंदूत 'डोपामिन' (Dopamine) नावाच्या रसायनाच्या स्रावात मोठा बदल होतो. डोपामिन हे मेंदूच्या 'रिवॉर्ड सिस्टीम'ला (Reward System) उत्तेजित करतं, ज्यामुळे आपल्याला आनंद आणि समाधानाची भावना मिळते. प्रत्येक वेळी आपण बोटाने स्क्रीन स्क्रोल करतो, तेव्हा "पुढच्या रीलमध्ये काय असेल?" ही उत्सुकता मेंदूला डोपामिन मिळवण्यासाठी तयार करते. फक्त 15 ते 30 सेकंदात मनोरंजन मिळत असल्याने, मेंदूला त्वरित डोपामिनचा डोस मिळतो. यामुळे मेंदूला या जलद आनंदाची सवय लागते आणि वाचन किंवा इतर कामांसारख्या सामान्य गोष्टी कंटाळवाण्या वाटू लागतात.
36
Image Credit : pinterest
रील्समुळे निर्माण होणाऱ्या समस्या
रील्सचा सर्वात मोठा धोका म्हणजे त्यात वेगाने बदलणाऱ्या भावना. एका रीलमध्ये दुःख, तर पुढच्याच क्षणी विनोद आणि तिसऱ्यात राग आणणारी घटना दिसते. मेंदूला एक भावना समजून घेण्यासाठी (Emotion Processing) थोडा वेळ लागतो, पण सतत स्क्रोलिंगमुळे तो वेळ मिळत नाही. जसं कॉम्प्युटरवर एकाच वेळी शेकडो टॅब उघडल्यास तो हँग होतो, तसंच रील्समुळे मेंदूत अनेक 'डिजिटल टॅब' उघडे राहतात. या ओझ्यामुळे 'ब्रेन फॉग' (Brain Fog) नावाची स्थिती निर्माण होते, ज्यात माणूस स्पष्ट विचार करू शकत नाही किंवा योग्य निर्णय घेऊ शकत नाही.
46
Image Credit : Getty
लक्ष केंद्रित करण्याची क्षमता होते कमी
सतत छोटे व्हिडिओ पाहिल्याने आपली लक्ष केंद्रित करण्याची क्षमता (Attention Span) खूप कमी होते. वेगाने बदलणारी दृश्यं पाहण्याची सवय झालेल्या मेंदूला पुस्तक वाचणं किंवा एखादं मोठं संभाषण ऐकणं खूप कंटाळवाणं वाटतं. मेंदूचा पुढचा भाग, ज्याला 'प्रीफ्रंटल कॉर्टेक्स' (Prefrontal Cortex) म्हणतात, तो नियोजन, निर्णयक्षमता आणि आत्म-नियंत्रण यांसारखी कामं करतो. रील्सच्या अतिवापरामुळे या भागाची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या कमी होते. यामुळे पाहिलेल्या किंवा शिकलेल्या गोष्टी मेंदूत दीर्घकाळ टिकत नाहीत.
56
Image Credit : Getty
काय करावे?
या न्यूरोलॉजिकल परिणामांपासून मेंदूला वाचवण्यासाठी आणि लक्ष विचलित होण्यापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी काही सवयी बदलणे आवश्यक आहे:• डिजिटल डिटॉक्स (Digital Detox): दररोज काही वेळ (उदा. सकाळी उठल्यावर पहिला तास आणि रात्री झोपण्यापूर्वी एक तास) मोबाईलशिवाय घालवा.• वेळेची मर्यादा: सोशल मीडिया ॲप्सवर 'ॲप टाइमर' (App Timer) सेट करून रील्स पाहण्याची वेळ दररोज 20-30 मिनिटांपर्यंत मर्यादित करा.• नैसर्गिक डोपामिन: व्यायाम, योग, वाचन, संगीत ऐकणे आणि निसर्गात वेळ घालवणे यांसारख्या आरोग्यदायी मार्गांनी डोपामिन मिळवा.
66
Image Credit : Getty
रील्स पाहण्यावर असा करा कंट्रोल
स्क्रीनवर वेगाने सरकणारं प्रत्येक रील आपल्या मेंदूची शांतता, एकाग्रता आणि भावनिक संतुलन हळूहळू हिरावून घेत आहे. 'अति तेथे माती' या म्हणीप्रमाणे, मनोरंजनासाठी असलेल्या या डिजिटल माध्यमांचा मर्यादित वापर करणे हेच आपल्या मानसिक आरोग्यासाठी आणि मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी सुरक्षित आहे.

