MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Horoscope 23rd April : चंद्र राशी बदलणार, 'या' ४ राशींना होणार मोठा धनलाभ! जाणून घ्या तुमचं भविष्य

Horoscope 23rd April : चंद्र राशी बदलणार, 'या' ४ राशींना होणार मोठा धनलाभ! जाणून घ्या तुमचं भविष्य

Horoscope 23rd April : २३ एप्रिल, गुरुवारी चंद्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या दिवशी धृती, शूल, सिद्धी, सर्वार्थसिद्धी, अमृतसिद्धी आणि गुरु पुष्य असे ७ शुभ-अशुभ योग जुळून येत आहेत. जाणून घ्या कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस...

3 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Apr 23 2026, 09:19 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
113
23 एप्रिल 2026 राशिफल
Image Credit : Asianet News

23 एप्रिल 2026 राशिफल

२३ एप्रिल २०२६ रोजी मेष राशीचे लोक प्रॉपर्टी खरेदी करू शकतात, तर कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ मिळेल. वृषभ राशीच्या लोकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये आणि स्वार्थी लोकांपासून दूर राहावं. मिथुन राशीचं उत्पन्न वाढू शकतं आणि अडचणी दूर होतील. कर्क राशीच्या लोकांना जास्त मेहनत करावी लागेल, अनुभवी व्यक्तींचा सल्ला कामी येईल. पुढे जाणून घ्या इतर राशींसाठी कसा असेल दिवस?

213
मेष राशिफल (Dainik Mesh Rashifal)
Image Credit : Getty

मेष राशिफल (Dainik Mesh Rashifal)

या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची चांगली साथ मिळेल. कुटुंबासोबत शॉपिंगला जाण्याचा योग आहे. प्रॉपर्टी खरेदी केल्यास फायदा होईल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील.

Related Articles

Related image1
Vastu Tips: तुळशीजवळ चुकूनही लावू नका ही ४ झाडं, नाहीतर घरात येईल संकट!
Related image2
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैशांची चणचण? घरात या चुका चुकूनही करू नका!
313
वृषभ राशिफल (Dainik Vrishbha Rashifal)
Image Credit : Getty

वृषभ राशिफल (Dainik Vrishbha Rashifal)

या राशीचे लोक मानसिकदृष्ट्या खूप कणखर अनुभवतील. जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, नाहीतर निष्काळजीपणा महागात पडेल. हवामानातील बदलामुळे होणाऱ्या आजारांचा तुमच्यावरही परिणाम होऊ शकतो. स्वार्थी लोकांपासून शक्य तितके दूर राहा.

413
मिथुन राशिफल (Dainik Mithun Rashifal)
Image Credit : Getty

मिथुन राशिफल (Dainik Mithun Rashifal)

या राशीच्या लोकांसाठी दिवस खूप शुभ फळ देणारा असेल. बऱ्याच काळापासून सुरू असलेली अडचण दूर होऊ शकते. व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांचं उत्पन्न वाढू शकतं. विद्यार्थ्यांनी अजिबात निष्काळजीपणा करू नये.

513
कर्क राशिफल (Dainik Kark Rashifal)
Image Credit : Getty

कर्क राशिफल (Dainik Kark Rashifal)

आज तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागू शकते. खाण्यापिण्याबाबत काळजी घ्या, नाहीतर पोट बिघडू शकतं. इतरांवर विनाकारण टीका-टिप्पणी करणं टाळा. मनात चुकीचे विचार येऊ शकतात. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सल्ला तुमच्या कामी येईल.

613
सिंह राशिफल (Dainik Singh Rashifal)
Image Credit : Getty

सिंह राशिफल (Dainik Singh Rashifal)

या राशीच्या लोकांना परदेशातून धनलाभ होण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफ पूर्वीपेक्षा चांगली राहील. मनात आत्मसमाधानाची भावना असेल. तुमच्या जोडीदाराला मोठं यश मिळू शकतं, ज्यामुळे तुम्हालाही खूप आनंद होईल. ठरवलेली कामं वेळेवर पूर्ण होतील.

713
कन्या राशिफल (Dainik Kanya Rashifal)
Image Credit : Getty

कन्या राशिफल (Dainik Kanya Rashifal)

या राशीचे तरुण आपल्या ध्येयापासून भरकटू शकतात. राजकारणाशी संबंधित लोकांना मोठं पद मिळू शकतं. दिलेले उसने पैसे आज परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठी डील होण्याची शक्यता आहे. वेळेचा सदुपयोग करण्यात यशस्वी व्हाल. उत्पन्नात वाढ होईल.

813
तुला राशिफल (Dainik Tula Rashifal)
Image Credit : Getty

तुला राशिफल (Dainik Tula Rashifal)

या राशीच्या लोकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल येऊ शकतो. परदेश प्रवासाचे योग बनत आहेत. पती-पत्नीमध्ये वाद होण्याचीही शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. वडिलांचा सल्ला तुमच्या खूप कामी येईल. आरोग्याची काळजी घ्या.

913
वृश्चिक राशिफल (Dainik Vrishchik Rashifal)
Image Credit : Getty

वृश्चिक राशिफल (Dainik Vrishchik Rashifal)

या राशीच्या लोकांनी आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवावं. कोणावरही रागवू नका, नाहीतर झालेलं काम बिघडू शकतं. विद्यार्थ्यांचं मन अभ्यासात लागणार नाही. तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणं टाळा. मीडियाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ राहील.

1013
धनु राशिफल (Dainik Dhanu Rashifal)
Image Credit : Getty

धनु राशिफल (Dainik Dhanu Rashifal)

या राशीचे जे लोक राजकारणाशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठी वेळ अनुकूल आहे. व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते. समाजात मान-सन्मान मिळेल. ठरवलेली कामं वेळेवर पूर्ण होतील. इच्छा नसतानाही काही कामं करावी लागू शकतात. इतरांच्या वादात बोलू नका.

1113
मकर राशिफल (Dainik Makar Rashifal)
Image Credit : Getty

मकर राशिफल (Dainik Makar Rashifal)

या राशीच्या लोकांची तब्येत बरीचशी ठीक राहील. ते भावनिकदृष्ट्या स्वतःला मजबूत समजतील. या लोकांचं उत्पन्न वाढू शकतं. मित्रांसोबत पार्टीमध्ये एन्जॉय कराल. नोकरीत वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. मुलांवर लक्ष ठेवा.

1213
कुंभ राशिफल (Dainik Kumbh Rashifal)
Image Credit : Getty

कुंभ राशिफल (Dainik Kumbh Rashifal)

या राशीच्या लोकांचे जुने वाद मिटू शकतात. कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार कराल. धर्म-कर्माकडे तुमचा कल अधिक राहील. प्रेम संबंध विवाहात बदलू शकतात. कोर्ट-कचेरीत काही वाद सुरू असेल तर त्यात यश मिळेल.

1313
मीन राशिफल (Dainik Meen Rashifal)
Image Credit : Getty

मीन राशिफल (Dainik Meen Rashifal)

या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करण्याची गरज आहे. नकारात्मक विचार तुमच्या कामात अडथळा आणू शकतात. घरात मित्रांचं येणं-जाणं सुरू राहील. मार्केटिंगशी संबंधित लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफ चांगली राहील.


(Disclaimer : या लेखात दिलेली माहिती ज्योतिष्यांनी सांगितलेली आहे. आम्ही फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीला केवळ सूचनेच्या स्वरूपात घ्यावं.)

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Jewellery: हलके, क्युट आणि स्टायलिश, काश्मिरी इअररिंग्सने बदला लूक
Recommended image2
Jewellery: मोठ्या चेहऱ्याला देतील बॅलन्स लूक या गोल्ड चेन इअररिंग्स
Recommended image3
Beauty Tips: उन्हाळ्यात केस किती वेळा धुवावेत? आणि कसे? जाणून घ्या योग्य पद्धत
Recommended image4
Fashion Tips: भावाच्या साखरपुड्यात दिसा खास, निवडा हे कॉटन लेहेंगा
Related Stories
Recommended image1
Vastu Tips: तुळशीजवळ चुकूनही लावू नका ही ४ झाडं, नाहीतर घरात येईल संकट!
Recommended image2
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैशांची चणचण? घरात या चुका चुकूनही करू नका!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved