Horoscope 29 January : कोणत्या राशीला होणार आर्थिक लाभ? कोणाला आरोग्याच्या समस्या? कौटुंबिक जीवन, नोकरी आणि आर्थिक स्थितीबद्दल जाणून घ्या संपूर्ण दैनिक राशीभविष्य. 

मेष = चांगले भोजन मिळेल. महिलांना सुख. पायाला दुखापत होण्याची शक्यता. कामात अडथळे. वरिष्ठांकडून त्रास. कौटुंबिक सौख्य. शनिदेवाच्या कवचाचे पठण करा.

वृषभ = अधिकाराचे बळ मिळेल. बोलण्याला मान मिळेल. आर्थिक मदत मिळेल. कौटुंबिक सौख्य. विद्यार्थ्यांना फायदा. परदेशी व्यवहारात फायदा. कुलदेवतेची प्रार्थना करा.

मिथुन = कामात अडथळे. जास्त खर्च होईल. जोडीदारासोबत सुसंवाद. गणपतीची प्रार्थना करा.

कर्क = कामात यश मिळेल. महिलांना व्यवसायात लाभ. दूध-दुग्धजन्य व्यवसायात फायदा. अधिकाऱ्यांसाठी अनुकूल दिवस. वडील-मुलांमध्ये मतभेद. नरसिंहाची प्रार्थना करा.

सिंह = यशाचा दिवस. महिलांना अधिकार मिळेल. वस्तूंचे नुकसान होण्याची शक्यता. व्यवसायात अनुकूलता. कार्तवीर्यर्जुनाचे स्मरण करा.

कन्या = कामात यश. धार्मिक कार्यात यश. महिलांना तीर्थक्षेत्राचे दर्शन. वैवाहिक जीवनात किरकोळ त्रास. लक्ष्मीनारायणाची प्रार्थना करा.

तूळ = कामाचा ताण राहील. प्रवासात सुख मिळेल. कर्ज आणि आजाराचा त्रास. ललिता सहस्रनामाचे पठण करा.

वृश्चिक = कामात यश. पराक्रमाचा दिवस. वैवाहिक जीवनात प्रेम. परदेश प्रवास योग. आवडत्या वस्तूंची खरेदी. व्यवसायात फायदा. पोटाचे विकार. गणपतीला अभिषेक करा.

धनु = कामात यश. मित्रांकडून सहकार्य. प्रवासात अडथळे. पाण्यासंबंधी समस्या. ग्रामदेवतेचे दर्शन घ्या.

मकर = कामात यश. प्रवासात सुख. मित्र आणि मुलांकडून फायदा. घसा-कानाचे विकार. शनिदेवाची प्रार्थना करा.

कुंभ = मित्र-नातेवाईकांसोबत वेळ घालवाल. खरेदी आणि धावपळ. मनोरंजन. कामात अडथळे. अपघात होण्याची शक्यता. बोलण्यामुळे नुकसान. कुलदेवतेची प्रार्थना करा.

मीन = कामात यश. बॅंक बॅलेन्स वाढेल. जवळच्या व्यक्तींकडून सल्ला. धाडसी कामे कराल. व्यवसायात फायदा. डोकेदुखीचा त्रास. शनिदेवाच्या कवचाचे पठण करा.