थायरॉइड राहिल नियंत्रणात, करा हे सोपे आणि घरगुती उपाय

| Published : Dec 28 2024, 05:56 PM IST

Home Remedies for Supporting Thyroid Health

सार

थायरॉइड नियंत्रणात ठेवण्यासाठी आयोडिनयुक्त आहार, तुळस, कोरफड अशाकाही आयुर्वेदिक गोष्टींचा वापर करावा. जाणून घेऊया थायरॉइडची समस्या नियंत्रणात राहण्यासाठी काही खास आणि सोपे उपाय सविस्तर...

Home remedies for thyroid problems : थायरॉइड आपल्या शरिरातल एक महत्वपूर्ण ग्रंथी असून घश्यासमोरील श्वसननलिकेच्या वरती असते. याचा आकार फुलपाखराच्या पंखांसारखा असतो. याच्या माध्यमातून शरिरात हार्मोन उत्सर्जित होतात. पण काहींना थायरॉइड ग्रंथीमध्ये समस्या निर्माण होते आणि थायरॉइडची समस्या उद्भवली जाते. यावर काही घरगुती उपाय आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

आयोडिनयुक्त आहाराचे सेवन

आयोडिन थायरॉइड हार्मोनच्या निर्माणासाठी गरजेचे आहे. अशातच आयोडिनयुक्त मीठ, समुद्री शेवाळ किंवा माशांचे सेवन करू शकता.

तुळस आणि कोरफडीचे सेवन

तुळशीची पाने पाण्यामध्ये उकळवून त्याची चहा तयार करू शकता. यामुळे थायरॉइडच्या समस्येपासून आराम मिळेल. याशिवाय कोरफडीच्या ज्यूसमध्ये मध मिक्स करुन उपाशी पोटी प्यावा.

अक्रोड आणि बदाम

अक्रोड आणि बदामामध्ये सेलेनियम असते, जे थायरॉइडसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. यासाठी दररोज 4-5 अक्रोड आणि बदामाचे सेवन करा. यामुळे थायरॉइडच्या समस्येपासून आराम मिळेल.

योगा आणि प्राणायम

योगा नेहमीच हेल्दी लाइफस्टाइलसाठी वरदान असल्याचे मानले जाते. यावेळी सर्वांगासन, मत्स्यासन आणि हलासन केल्याने थायरॉइड संतुलित राहण्यास मदत होऊ शकते. याशिवाय प्राणायममध्ये अनुलोम-विलोम आणि उज्जायी करू शकता.

आलं आणि दालचिनीचा वापर

आल्याची चहा किंवा दालचिनीची चहा प्यायल्याने थायरॉइडच्या समस्येपासून आराम मिळतो. दररोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यातून दालचिनीची पावडर मिक्स करुन पिऊ शकता.

आयुर्वेदिक गोष्टी

पालक, मेथी अशा पालेभाज्या थायरॉइड नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. याचा नियमित आहारात समावेश करावा. सकाळी उपाशी पोटी आवळ्याचा ज्यूस प्या. याशिवाय थायरॉइडच्या संतुलनासाठी अश्वगंधाचे चूर्ण सेवन करू शकता.

( Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

मलायका सडपातळ कंबरेमागचे सीक्रेट आहे ही रेसिपी, तुम्हीही करा

सातूच्या पिठाचे घरच्या घरी पटकन बनवा लाडू, मुलांसाठी टेस्टी आणि हेल्दी